सिंधुदुर्ग – बांदा – दाणोली मार्गावर ओटवणे तिठ्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने गोवा बनावटीच्या अनधिकृत दारू वाहतुकी विरोधात कारवाई केली.
स्कॉर्पिओ वाहनासह दारुबंदी गुन्हयांअंतर्गत एकूण ८ लाख २० हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
अनधिकृत दारु वाहतूक प्रकरणी समाधान शिवाजी चवरे (२७) आणि समाधान मारुती चव्हाण (२८, दोघेही रा. पेनुर ता. मोहोळ जि. सोलापूर) यांना अटक करण्यात आली.
गोव्याहून बांदा – दाणोली रोडवर ओटवणे तिठा येथून कोल्हापूरच्या दिशेने जाणारी महिन्द्रा स्कॉर्पिओ (एमएच०४ जीएम ८०६७) तपासणीसाठी थांबविण्यात आली.
या कारमध्ये ॲन्ड्रॉईड मोबाईलसह गोवा बनावटीच्या दारुचे विविध ब्रॅन्डचे ३५ बॉक्स आढळून आले.
बाजारभावाप्रमाणे त्याची किंमत ३ लाख १५ हजार ८४० रुपये आहे. बेकायदा दारु वाहतूकप्रकरणी सोलापूरातील दोघा युवकांना अटक करण्यात आली.
सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाने अधीक्षक डॉ. बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरिक्षक एस. एस. काळे, सहायक दुय्यम निरिक्षक गोपाळ राणे यांनी केली.