ऐतिहासिक किल्ल्यांचे संवर्धन करणे व जतन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी-खासदार संभाजीराजे

0
352

सिंधुदुर्ग – छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून आम्हाला सार्थ अभिमान आहे.त्याचबरोबर ऐतिहासिक किल्ल्यांचे संवर्धन करणे व जतन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. निव्वळ पत्रे देऊन अशा किल्ल्याचे जतन होणार नाही तर त्यासाठी शासन तसेच पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा करणेही महत्वाचे आहे. रायगड प्राधिकरणच्या धर्तीवर अन्य किल्ल्यांचेही प्राधिकरणमार्फत संवर्धन होणेसाठी विशेष प्रयत्न होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन खासदार संभाजीराजे यांनी विजयदुर्ग किल्ल्याच्या पहाणी प्रसंगी बोलताना केले.

या दौऱ्यात त्यांच्या समवेत आम.वैभव नाईक, शिवसेना नेते अतुल रावराणे,तालुका प्रमुख विलास साळसकर, मिलिंद साटम, प्रसाद करंदीकर, प्रथमेश सावंत, सरपंच प्रसाद देवधर, उपसरपंच महेश बिडये, दामाजी पाटील, विभाग प्रमुख संदीप डोळकर, रमाकांत राणे, संतोष साटम, सचिन खडपे, सुनील खडपे, अविनाश गोखले, रामचंद्र सारंग व अन्य उपस्थित होते. या दौऱ्यात त्यांनी संपूर्ण विजयदुर्ग किल्ल्यांची, तटबंदीची तसेच कोसळलेल्या भागाची पहाणी करून ऐतिहासिक तलाव, भवानीमाता मंदिर, राजमहाल, कोठार, गोड्या पाण्याची विहीर, जीबीचा दरवाजा या ठिकाणांची पहाणी करून किल्ले संवर्धन करणे त्यांचे जतन करीत असताना यात कोणत्याही प्रकारची राजकीय टीका करणार नाही परंतु किल्ले संवर्धन अथवा जतन करीत असताना कोणीही राजकारण करू नये असेही त्यानी सांगितले. या दौऱ्यात विजयदुर्ग ग्रामपंचायत, गाबित समाज यांच्यावतीने निवेदन खासदार संभाजी राजे यांचेकडे सादर करण्यात आली. सुमारे दोन तासाहून अधिक काळ किल्ले परिसराची पहाणी करून विजयदुर्ग किल्ल्याचे जतन व संवर्धन करण्याकरीत स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेऊन कार्य करणार असल्याचेही स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here