एकच घाव घातला पण जोरदार घाव घातला पीएफआयवरील बंदीनंतरआमदार नितेश राणेंचं विधान म्हणाले रझा अकादमी ही दहशतवादी संघटना बाकी आहे

0
170

 

सिंधुदुर्ग – केंद्र सरकारने पीएफआय संघटनेवर बंदी घातल्यानंतर भाजपा नेते आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “एकच घाव घातला पण जोरदार घाव घातला” असे म्हणताना राणे यांनीआता त्याच धर्तीवर काम करणारी रझा अकादमी ही दहशतवादी संघटना बाकी आहे. असे म्हटले आहे.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेला केंद्र सरकारने बेकायदेशीर संघटना घोषित केलं आहे. पुढील पाच वर्षांसाठी ही संघटना आणि त्यांच्याशी संलग्न संस्थांना हा निर्णय लागू असेल असं केंद्राने म्हटलं आहे.

पीएफआयची स्थापना करणारे काही सदस्य हे स्टूडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया म्हणजेच सीमीचे सदस्य असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली आहे. या संघटनेचे जमात-उल-मुजाहिद्दीन बांगलादेश (जेएमबी) या संघटनेशी संबंध असल्याची माहितीही समोर आली आहे. या दोन्ही बंदी घातलेल्या दहशतवादी संघटना आहेत.

केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर भारतीय जनता पार्टीचे नेते नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्वीट करत केंद्र सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. एकच घाव घातला पण जोरदार घाव घातला. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना सलाम. पीएफआयवर बंदी घालणे ही काळाची गरज होती. आता त्याच धर्तीवर काम करणारी रझा अकादमी ही दहशतवादी संघटना बाकी आहे. सर्वांना मिटवून टाका, हा आमचा हिंदुस्तान आहे, अशा आशयाचं ट्वीट नितेश राणेंनी केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here