उपजिल्हा रुग्णालय कणकवलीतील कर्मचारी कोरोना बाधित,कणकवलीकरांमध्ये भीतीचे वातावरण

0
187

सिंधुदुर्ग – कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील दोन नर्सेस आणि तीन अन्य कर्मचार्‍यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रुग्णालय कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत कणकवली तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पोळ यांनी माहिती दिली. दरम्यान आतापर्यंत तालुक्यातील रुग्नांची संख्या ३३० वर पोचली असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कणकवलीत कोरोना रुग्नांमध्ये उपजिल्हा रुग्णालयाच्या डायलिसिस कक्षातील दोन नर्सेस आणि दोन तांत्रिक व अन्य एका कर्मचार्‍याचा समावेश आहे. तालुक्यातील रुग्णालयात कोरोनाने शिरकाव केल्याने या रुग्नालयावर अवलंबून असलेल्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान कणकवली उपजिल्हा रुग्णालय केवळ नॉन कोविड सेंटर म्हणूनच वापरावे तसेच येथे कोणत्याही रुग्णांचे स्वॅब घेण्यात येऊ नयेत. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा माजी आमदार तथा मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिला आहे. यावेळी उपरकर म्हणाले, कणकवली रुग्णालयातील चार पेशंट, एक डॉक्टर व एका नर्सचे नातेवाईक असे एकूण सहाजण पॉझिटिव्ह आल्याचे समजते. यातील एक तर तपासणी करून झाल्यानंतर कणकवली ते फोंडा व परत असा प्रवास करून ऍडमिट झाला आहे. त्यानंतर त्याचा स्वॅब पॉझिटिव्ह आला. आज जरी तेथील डॉक्टर व नर्सेसचे स्वॅब घेतलेले असले, तरीही भविष्यात त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊ शकतात. ज्या वॉर्डमध्ये हे पेशंट आढळले, त्या वॉर्डमधील इतरांचे स्वॅब घेऊन आयसोलेशनमध्ये ठेवलेले असले, तरीही भविष्यात यातीलही काहीजण पॉझिटिव्ह येण्याची शक्यता नाकारता येत नाही. उपजिल्हा रुग्णालय हे नॉन कोविड असल्याने रुग्णालयातील डॉक्टर व नर्सिंग स्टाफने कोविड रुग्ण तपासू नयेत, अशी मागणी यापूर्वी मनसेने केली आहे. कोविडची स्वॅब तपासणी करताना डॉक्टर व नर्सेस स्टाफची प्रतिकारशक्ती कमी झाल्यास त्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो व त्यातून रुग्णालयात सेवा देणाऱया इतरांना संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो. या साऱयाच्या पार्श्वभूमीवर सर्व रुग्णालयांचे निर्जंतुकीकरण करून शासनाने व कोविड १९ च्या आयसीएमआरच्या नियमावलीनुसार हॉस्पिटलची निगा राखण्यात यावी. अशा परिस्थितीत रुग्णालयातील डॉक्टर, पेंशट, मुंबईहून आलेले चाकरमानी हे रुग्णालयात तपासणीसाठी गेल्यानंतर त्यांना तसेच आयसोलेशनमधून पाच दिवसांनंतर डिस्चार्ज दिलेले घरी गेल्यावर त्यांच्यापासूनही संसर्गाचा धोका उद्भवू शकतो. या साऱयाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयात स्वॅब घेऊ नयेत तसेच डॉक्टर व स्टाफला कोविडची कामगिरी देऊ नये. तसे न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा उपरकर यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here