उद्योगमंत्री सामंत यांना जाळून मारण्याची धमकी देणाऱ्याचा पुतळा जाळला सिंधुदुर्गात शिंदे शिवसेना गट आक्रमक

0
305

सिंधुदुर्ग – उद्योगमंत्री उदय सामंत यांना जिवंत जाळून मारण्याचे भर सभेत वक्तव्य करणाऱ्या ग्रीन रिकायनरी विरोधक अप्पा जोशी यांचा प्रतिकात्मक पुतळा शिंदे शिवसेना गटाकडून जाळण्यात आला. कणकवली मध्यवर्ती शाखेसमोर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत अप्पा जोशी यांचा निषेध केला.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या राजापूर दौऱ्यात रिफायनरी विरोधक आप्पा जोशी नामक व्यक्तीने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याबाबत केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. शिवसेनेच्यावतीने आम्ही याचा निषेध करतो. यापुढे असे वक्तव्य केल्यास त्याला त्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल, असा इशारा शिवसेना शिंदे गटाच्यावतीने देण्यात आला. यावेळी आप्पा जोशी यांच्या पुतळ्याचे दहनही करण्यात आले.

नाना पटोले यांच्या राजापूर दौऱ्यात रिफायनरी विरोधक श्री. जोशी यांनी उदय सामंत यांना जाळून मारण्याच्या अनुषंगाने वक्तव्य केले होते. वक्तव्याचा माजी जि. प. सभापती संदेश पटेल यांनी निषेध केला. यावेळी सुनील पारकर, भूषण परुळेकर, शेखर राणे, दामू सावंत, बाळू पारकर, दिलीप घाडीगावकर व इतर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here