सिंधुदुर्ग – रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर दाखल केलेला गुन्हा हा सूड भावनेतून केलेली आहे. उद्धव ठाकरे सरकारने चालवलेल्या या नव्या उद्योगाचा मी निषेध करतो अशा शब्दात भाजपा खासदार नारायण यांनी या कारवाईवर आपले मत व्यक्त केलेआहे.
सिंधुदुर्गात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नारायण राणे यावेळी म्हणाले, अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात जो रायगडमध्ये २०१८ ला गुन्हा दाखल झाला आहे तो गुन्हा आत्महत्या करायला त्यानिप्रवृत्त केलं असा त्यांचा आरोप आहे आणि त्याबाबतीत हा गुन्हा आहे. हि केस क्लोजही झालेली आहे. आणि त्यामुळे सुडाने आणि आकसाने उद्धव ठाकरे सरकारने जे उद्योग सुरु केलेत त्यातील हा नवा उद्योग आहे त्याचा मी निषेध करतो असे नारायण राणे यावेळी म्हणाले.
राणे पुढे म्हणाले अर्णब गोस्वामी यांच्या कुटुंबियांना, त्यांच्या मुलाला जी वागणूक पोलिसांनी दिली त्याबद्दल मी निषेध करतो. अशी कारवाई मुंबई पोलिसांची आणि रायगड पोलिसांची अतिरेक्यांविरुद्ध, ड्रग्ज सप्लाय करणाऱ्यांविरुद्ध आणि बलात्कार करून खून करणाऱ्यांविरुद्ध केली गेली नाही आहे. सुशांतची केस, दिशांची केस, रियाची केस नजीकच्या आहेत. तिथे केलेला पोलिसांनी पराक्रम जनतेला माहिती आहे. तेव्हा एका संपादकाविरोधात जुन्या खटल्याचा संदर्भ देऊन पाचशे पाचशे पोलीस घेऊन जाऊन अटक करावी असं प्रकारचं धाडस जे कोण मुंबईत अतिरेकी असतील, ड्रग्ज पुरवठा करणारे असतील, लहान मुलांना पळवून नेवून व्यापार करणारे असतील, बलात्कार करून खून करणारे असतील त्यांच्या विरुद्ध या पोलिसांकडून का आतापर्यंत कारवाई झाली नाही. या सरकारच्या प्रमुखांना कायद्याची जाण नाही. कायद्याची अंमलबजावणी कशी करावी हे याना माहित नाही. सरकार चालवायला असमर्थ ठरलेली हि मंडळी, हे मुख्यमंत्री सत्तेचा दुरुपयोग करीत आहेत. नेहमी शिवाजी महाराजांचं नाव सांगून सरकार चालवणारे त्यांचा कारभार, त्यांची हि कारवाई पाहता त्यांनी महाराजांचा नाव घेणं बंद करावं, महाराजांची बदनामी करण्याचं काम बंद करावं असं मला वाटत असेही ते म्हणाले.
हि अर्णब गोस्वामी यांच्यावर कारवाई झाल्यानंतर प्रसार माध्यमाचे प्रमुख गप्प आहेत नेहमीच पत्रकारांवर अन्याय होतोय म्हणून गळा काढणारे आता गप्प का असा प्रश्नही त्यांनी यावेळी केला.