इ. 10 वी चा पेपर फुटला नाही प्रा. वर्षा गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण यांचे स्पष्टीकरण

0
257

 

मार्च 2020 इ. 10 वी परीक्षा केंद्र क्र. 3351, कुऱ्हा, काकोडा, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव येथे मराठी विषयाची प्रश्नपत्रिका फुटीबाबत वृत्त प्रसिध्द झाले होते. याविषयी अधिकाऱ्यांकडुन माहिती घेतली. याबाबत नाशिक विभागीय शिक्षण मंडळाकडून सविस्तर अहवाल मागविण्यात आला. विभागीय सचिवांनी सखोल चौकशी करून अहवाल सादर केला आहे. त्यानुसार वरिल परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारची प्रश्नपत्रिका फुटली नसल्याचे नमूद केले आहे. प्रश्नपत्रिका फुटीचे वृत्त चुकीचे असल्याचे स्पष्ट केले आहे.
त्यामुळे इ. 10 वी परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तणावमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जावे.
सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींना परीक्षेनिमित्त हार्दिक शुभेच्छा! असेही मंत्री महोदयांनी विद्यार्थ्यांना उद्देशून आवर्जून नमूद केले.
दरम्यान, अशा पध्दतीच्या पेपरफुटीच्या बातम्या पसरविणाऱ्या माध्यमांनीही परीक्षार्थींच्या मानसिकतेवर परिणाम होईल, अशा बातम्या प्रसिध्द करू नये असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री, प्रा. वर्षा गायकवाड यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here