सिंधुदुर्ग – हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी रविवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले आरवली वेतोबा देवस्थानला भेट देत सपत्नीक दर्शन घेतले.
यावेळी त्यांचे आरवली देवस्थान समितीच्या वतीने स्वागत केले. आर्लेकर हे गोवा विधानसभेचे माजी सभापती असून अलिकडेच त्याची हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी देवस्थान कमिटी तर्फे अध्यक्ष जयवंत राय, विश्वस्त सचिन दळवी, डॉ प्रसाद साळगावकर, शेखर पणशीकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी, प्रांताधिकारी सुशांखांडेकर, वेंगुर्ला तहसीलदार प्रवीण लोकरे आदी उपस्थित होते.