आयुर्वेदिक व होमिओपॅथी कंत्राटी डॉक्टरना तीन महिने नाही पगार

0
394

सिंधुदुर्ग – कोरोना संसर्गाच्या काळात सर्वाधिक जबाबदारी डॉक्टर, नर्स,आणि आरोग्य यंत्रणेशी निगडित असलेल्या कर्मचाऱ्यांनी निभावली.स्वतःचा जीव धोक्यात घालून आजही ते काम करत आहेत.अशा या कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न शासनाकडे प्रलंबित आहेत.अनेकांना मानधन नाही तर अनेक पदे रिक्त असल्यामुळे उर्वरित कर्मचाऱ्यांवर अठरा ते २४तास ड्युटी करण्याची वेळ आली आहे.त्यात अनेकांना तर तुटपुंजा पगार दिला जातो.तर कंत्राटी आयुर्वेद व होमिओपॅथी वैद्यकीय अधिकाऱ्यांना गेली तीन महिने पगारच दिलेला नाही.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विचार करता जिल्हा, उपजिल्हा रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रामंध्ये काम करणारे ४० आयुर्वेदिक व होमिओपॅथी कंत्राटी डॉक्टर आहेत.गेली तीन महिने कोरोनाच्या काळात हे योध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करतात मात्र त्यांना तीन महिन्याचा एक रुपया सुद्धा पगार दिला नाही.या आयुर्वेदिक व होमिओपॅथी डॉक्टर ना अशा अडचणीच्या ठिकाणी ड्युट्या दिल्या जातात की प्रवासातच ते मेटा कुटीला येतात. उदाहरणार्थ वेंगुर्ले चा कर्मचारी आंबोली किंवा फोंडाघाट ,खारेपाटण अशा चेकपोस्ट च्या ठिकाणी ड्युटीवर पाठविला जातो.त्यात त्याला वाहतुकीचा भत्ता नाही.हे सर्व करत असताना किमान पगारतरी वेळेवर झाला पाहिजे होता ते सुद्धा नाही. ‘समान काम समान वेतन’ हा कायदा आपल्याकडे आहे मात्र या कंत्राटी कामगारांना आणि डॉक्टर ना लागू नाही. त्यामुळेचआयुर्वेद डॉक्टरना कर्नाटक प्रमाणे किमान ६५००० रुपये वेतन दिले जावे अशी मागणी होऊ लागली आहे.तुटपूज्या पगारावर हे काम करत आहेत.मात्र दिली जाणारी जबाबदारी मोठी असते,काम खूप असते.जीव धोक्यात घालून काम करावे लागते.चेकपोस्टवर काहीं सुविधा नसताना काम करावे लागते महिला डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना बाथरूम सुद्धा स्वतंत्र नाहीत अशी स्थती आहे .कायमस्वरूपी सेवेत असलेल्या आणि भरपूर पगार असलेल्या डॉक्टर किंवा कर्मचाऱ्यांच्या पेक्षा जास्त काम या कंत्राटी डॉक्टर आणि कामगारांना दिले जाते.त्यात कोविड योद्धा म्हणून दहा लाखाचा मृत्यूनंतर दिला जाणारा इन्शुरन्स सुद्धा कंत्राटी आयुर्वेदिक व होमिओपॅथी डॉक्टर चा उतरलेला नाही आणि केला असेल तर त्याचा स्पष्ट उल्लेख असलेला जीआर नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here