आमदार वैभव नाईक यांच्यातर्फे कुडाळ महिला, बाल रुग्णालयाच्या कोविड सेंटरसाठी ५०० रेमडेसिवीर इंजेक्शने

0
81

सिंधुदुर्ग – कुडाळ येथील महिला,बाल रुग्णालयाच्या कोविड सेंटरसाठी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्यावतीने तब्बल ५०० रेमडेसिवीर इंजेक्शने देण्यात आली आहेत. आज वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हि इंजेक्शने रुग्णालयाला सुपूर्त करण्यात आली. याचा कोविड रुग्णांना लाभ होणार आहे.

जिल्ह्यात कोविड रुग्णसंख्या वाढत असल्याने खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, यांच्या प्रयत्नांतून कुडाळ येथील महिला, बाल रुग्णालयात सुरु करण्यात आलेले डीसीएचसी सेंटर कोरोना लढ्यात महत्वपूर्ण योगदान देत आहे. रुग्णालयात सध्या ६० कोरोना रुग्ण ऑक्सिजन वर आहेत. वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रमोद वालावलकर, डॉ. गौरव घुर्ये यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांवर चांगले उपचार सुरु आहेत. रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शनची कमतरता भासता नये यासाठी आमदार वैभव नाईक यांनी ५०० रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून दिली आहेत. तसेच वैभव नाईक यांनी जिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधून महिला बाल रुग्णालयाला चार वॉर्डबॉय देण्याची मागणी केली. ती मागणी मान्य करण्यात आली असून लवकरच चार वॉर्डबॉय देण्यात येणार आहे. असे यावेळी वैभव नाईक यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here