आमदार नीतेश राणेंनी हाती धरला नांगर

0
629

सिंधुदुर्ग – आमदार नीतेश राणे यांनी गुरुवारी आपले वरवडे गाव गाठले व चक्क शेतामध्ये उतरत जोत हातात धरले. यावेळी राणे यांनी अगदी पॉवरटिलरही चालवला. विशेष म्हणजे लावणी लावण्यातही राणे मागे राहिले नव्हते. राणे यांच्या शेतीतील आगमनाने उपस्थित शेतकरीवर्गही उत्साहीत झाला होता. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसमवेत शेतबांधावरच न्याहरीचाही आनंद लुटला. राणे कुटुंबियांची वरवडे येथे शेतजमिन आहे. कोकणी माणूस नेहमीच शेतीत रमणारा असतो. अर्थातच गावातील शेतकर्यांसोबत काही वेळ घालवता आला, याचा आनंद असल्याचे राणे म्हणाले. याप्रसंगी राणे यांच्यासमवेत माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोठ्या सावंत, माजी पं. स. सभापती प्रकाश सावंत, भाजप तालुका उपाध्यक्ष सोनू सावंत, महेश गुरव, आनंद घाडी, सुभाष मालंडकर, अशोक घाडी, दीपक घाडी, रामा निर्गुण, प्रकाश घाडी, सत्यवान निर्गुण , गणेश परब, सुरेश घाडी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here