आझाद मैदानावर शहीद जवानांना श्रद्धांजली

0
222

 

पणजी : अखिल भारतीय माजी सैनिक कल्याण संघटना, गोवा आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई येथील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद पोलिस, जवान व लोकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पणजी येथील आझाद मैदानावरील हुतात्मा स्मारकावर गुलाबाच्या पाकळ्या आणि मेणबत्ती पेटवून हुतात्मा, शहिदांची आठवण काढण्यात आली.
कार्यक्रमाला अखिल भारतीय माजी सैनिक संघटना, गोवाचे अध्यक्ष अनंत जोशी, सम्राट क्लबचे अधिकारी तसेच पणजी महानगरपालिकेचे महापौर रोहित मोन्सेरात यांची उपस्थिती होती.
अखिल गोवा माजी सैनिक कल्याण संघटनेने पणजी मनपा, रोटरी क्लब, ऑक्ट्रा, अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद, होली, रोटरी क्लब पर्वरी, रोटरी क्लब मीरामार, रोटरी क्लब ऑफ पणजी मिडटाऊन आणि देशप्रेमी नागरीकांच्या या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

मुंबई येथील ताज हॉटेलमध्ये 2008 साली दहशतवादी हल्ला झाला होता. त्यात पोलिस आणि कर्मचारी मृत्युमुखी पडले होते. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पाकिस्तानी दहशतवादी मुंबईत आल्यावर जवळ जवळ 72 तास त्यांनी हल्ला सुरू ठेवला होता. यामध्ये पोलिस शहीद झालेच त्याचप्रमाणे काही नागरिकांनाही जीव गमवावा लागला. शेवटी पोलिस दलाला हेलिकॉप्टरचा वापर करून दहशतवाद्यांवर हल्ला करण्याची वेळ आली.
प्रा. प्रजल साखरदांडे याविषयी बोलताना म्हणाले, मुंबई येथील प्रमुख जागेवर हा हल्ला करण्यात आला होता, त्यावेळी गोमंतकीय युवक ताज हॉटेलमध्ये काम करत होता. या युवकाला तसेच इतर सर्वांना मी शहीद समजतो. देशासाठी ज्यांनी ज्यांनी आपले जीवन अर्पण केले आहे ते सर्व हुतात्मे आहेत. आम्ही ज्यावेळी घरात शांत झोपतो तेव्हा कुणीतरी देशाच्या सीमेवर आमच्यासाठी स्वत:चे प्राण देतो, याची आठवण त्यांनी करून दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here