सिंधुदुर्ग – गेल्या आठवडाभर मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे सावंतवाडी-बेळगाव राज्यमार्गावर आंबोली मुख्य धबधब्याजवळ भली मोठी दरड कोसळली आहे.
त्यामुळे सावंतवाडी-बेळगाव व कोल्हापूर मार्ग ठप्प झाला आहे.
गेले चार दिवस जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे माडखोल धवडकी दरम्यान मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने परिसरातील घरात पावसाचे पाणी घुसले आहे.
तसेच पावसामुळे आंबोली धबधब्यपासून दीड किलो मीटरच्या अंतरावर रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली असल्याची माहिती सावंतवाडी पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी दिली आहे.
त्यामुळे आंबोली-सावंतवाडी हा राज्यमार्ग ठप्प झाला आहे. कोसळलेली दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून दुपारपर्यंत रस्ता मोकळा होईल, अशी माहिती पी. डब्ल्यू. डी. खात्याने दिली आहे.