सिंधुदुर्ग – येथील आंबोली घाटात एका युवतीने उडी घेतली होती.तीने आत्महत्येचा प्रयत्न केला असावा असा पोलिसांचा संशय होता. ही घटना आज सायंकाळी चार वाजण्यास सुमारास घडली होती. संबधित मुलगी त्या ठीकाणी रिक्षाने आली होती. आणि तीने अचानक उडी घेतली, तिच्यापर्यंत पोचण्यात यश आले असून ती सुखरूप आहे असे हवालदार दत्ता देसाई यांनी सांगितले.
येथिल घाटात उडी घेणारी “ती” युवती सुखरूप आहे. तिच्यापर्यंत रेस्क्यू टीम पोचली आहे.आता तिला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.संबंधित युवती नेमकी कुठची?, कुठून आली?, याबाबत अधिक माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. तिला बाहेर काढल्यानंतर ती नेमकी कुठची तीने हा प्रकार का केला? याचा उलगडा होणार आहे,असे आंबोली पोलीस ठाण्याचे हवालदार दत्ता देसाई यांनी सांगितले.



