आंबा घाटातील एक संरक्षक भिंत वाहून गेली, मार्गही खचला 

0
228
कोंकण –   रत्नागिरी – कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील आंबा घाटातील एक संरक्षक भिंत वाहून गेली असून रस्त्याला तडे गेल्याने हा रस्ता वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. मुसळधार पावसाने कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला झोडुन काढले आहे. गेल्या २४ तासात संगमेश्वर तालुक्यात १०० मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. याच मुसळधार पावसाचा फटका रत्नागिरी आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्याना जोडणाऱ्या आंबा घाटाला बसला आहे.
आंबा घाटात यावर्षीच्या पावसा आधी नव्याने संरक्षक भिंत बांधण्यात आली होती. कालच्या मुसळधार पावसात हि भिंत वाहून गेली. भिंत ज्या भागात कोसळली त्याच भागातील रस्त्याला काही ठिकाणी तडे गेले होते. त्या भागात बॅरिकेट्स लावून काल एका बाजूने वाहतूक सुरु होती. आज दुपारी पुन्हा आंबा घाटात रस्ता खचला त्यामुळे सुरक्षितता म्हणून या मार्गावरची वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग पावसामुळे बंद असताना आता रत्नागिरी कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गही बंद पडल्याने तालुक्यात येणारा भाजीपाला, दुध व इतर गोष्टीचा तुटवडा जाणवणार आहे.
(सौजन्य : www.sahajshikshan.com )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here