आंतर राज्य प्रकल्प असलेल्या तिलारीत भूकंपमापन यंत्र महिनाभरापासून बंद

0
491

 

सिंधुदुर्ग – तिलारी धरणक्षेत्र परिसरात प्रकल्प प्रशासनाचे असलेले भूकंपमापन यंत्र गेल्या काही महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. सध्याच्या लॉकडाऊन कालावधीमुळे दुरुस्तीसाठी हे यंत्र कुठेही नेता येत नसल्याने संबंधित प्रशासनाची गोची झाली आहे.

तिलारी पाटबंधारे प्रकल्पाच्या धरणक्षेत्र परिसरात प्रकल्प प्रशासनाने भूकंपमापन यंत्र ठेवलेले आहे. एका सुसज्ज इमारतीसह हे यंत्र असून तिलारी परिसर तसेच दोडामार्ग तालुका शिवाय सिंधुदुर्ग जिह्यात कुठेही भूकंपाचे धक्के बसलेले असतात. त्याची नोंद रिस्टर स्केलसहित या उपकरणाकडे मिळते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून हे भूकंपमापन उपकरण बंद आहे. काही तांत्रिक बिघाडामुळे हे उपकरण बंद पडले असून समजा एखाद्या वेळेस भूकंपाचा धक्का बसला तर त्याची नोंद मिळू शकत नाही. तिलारी प्रकल्प प्रशासनाचे अधिकारी मुगदल यांना या संदर्भात विचारले असता सदर यंत्राची दुरुस्ती नाशिक येथे केली जाते. मात्र, लॉकडाऊनमुळे कुठेही ये-जा करणे शक्य होत नसल्याने व नाशिक येथे मनुष्यबळ कमी असल्याचे तेथून सांगण्यात आल्याने आम्ही हे यंत्र दुरुस्तीला नेऊ शकलो नाही, असे त्यांनी सांगितले.

सोशल माध्यमांवर भूकंप झाल्याची चर्चा असल्याने सत्यता पडताळण्यासाठी तिलारीचे अधिकारी यांना विचारले असता यंत्र बंद असल्याची माहिती समोर आली. त्यांनी दुसऱया ठिकाणच्या कोयना येथील यंत्रातील नोंद विचारुन सांगतो, असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here