सिंधुदुर्ग – अमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील, रिलायन्स या अँप मार्फत ग्राहकांना घरबसल्या गरजेच्या जीवनावश्यक वस्तू ऑनलाईन ऑर्डर केल्यानंतर घरपोच मिळत आहेत. कोरोनाच्या या संकट काळात किराणा, भाजीपाला, मटण, मासे या जीवनावश्यक वस्तू या घरपोच मिळाव्या यासाठी अलिबागमधील सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणांनी एकत्र येऊन माय रायगड हे ऑनलाईन अँप तयार केले आहे.
या अँपमुळे अलिबाग तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील नागरिकांना घरबसल्याऑनलाईन किराणा, भाजीपाला, मटण, मासे, दूध हे घरपोच मिळणार आहे. कोरोना काळात गर्दी टाळण्याच्या दृष्टीने या अँपचा वापर केल्यास कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठीही याचा उपयोग होणार आहे. अलिबाग तहसीलदार सचिन शेजाळ यांच्या हस्ते या अँपचे उदघाटन करण्यात आले.
अलिबागसह जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव हा वाढू लागला आहे. बाजारात खरेदी साठी नागरिक गर्दी करत असून सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळले जात नाहीत. अनेक वेळा तोंडाला मास्क ही वापरत नसतात. यामुळे कोरोना बाधा होण्याची भीती निर्माण झालेली आहे. कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या लॉकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तूची दुकाने बंद राहणार आहेत. त्यामुळे किराणा सामान, भाजीपाला, दूध, मटण, चिकन याची खरेदी कशी करायची हा एक प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.



