अतुल रावराणे यांच्याकडून१००० पीपीई कीट चे खासदार.विनायक राऊत यांच्या हस्ते वितरण

0
263

 

सिंधुदुर्ग – कोरोनाच्या युद्धात वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य उंचावण्याची गरज आहे. तसेच त्यांना जमेल ती मदत करण्याची गरज आहे.याच भावनेतून शिवसेनेचे पदाधिकारी अतुल रावराणे यांनी डॉक्टरांसाठी पीपीई किट उपलब्ध करून दिले आहेत. असे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या खाजगी डॉक्टर यांनी आपली वैद्यकीय सेवा सुरु केली असून आपण त्यांचे आभार मानतो. असे ही यावेळी खासदार राऊत म्हणाले.

आमदार वैभव नाईक यांच्या निवासस्थानी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते अतुल रावराणे यांच्या माध्यमातून खाजगी डॉक्टरना ६०० व सरकारी डॉक्टरना ४०० अशा १००० पीपीई कीट चे वितरण करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय सेवा देताना या पीपीई कीट डॉक्टरांसाठी अत्यंत महत्वपूर्ण आहेत. याप्रसंगी आमदार वैभव नाईक, जिल्हा बँकेचे अध्यक्ष.सतीश सावंत,संदेश पारकर, डॉ.सुहास पावसकर, डॉ.विद्याधर तायशेटे, हर्षद गावडे, प्रथमेश सावंत आदि उपस्थित होते.

यावेळी, खासदार.विनायक राऊत पुढे म्हणाले, आपल्या जिल्यातील आरोग्य यंत्रणेने कोरोनाचे संकट परतवून लावले आहे. लवकरच आपला समावेश “ग्रीन झोन” मध्ये होईल परंतु या युद्धात चांगले काम केलेल्या सर्वांचेच मनोधैर्य उंचावण्याची गरज आहे. अजून काही मदत या लोकांना लागेल ती पूर्ण करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत असेही ते यावेळी म्हणाले.

सर्वांनी खबरदारी घ्यावी – अतुल रावराणे.

कोरोनाच्या संकटात रुग्णावर उपचार करणारा ” डॉक्टर हाच महत्वाचा घटक आहे , डॉक्टर सुरक्षित असतील तर ही समस्या मार्गी लागू शकेल.” या भावनेतून आपण हि १००० पीपीई कीट देत असल्याचे अतुल रावराणे यांनी सांगितले.आपला जिल्हा कोरोनामुक्त झाला असला तरी, कोरोनाचा थांबलेला प्रादुर्भाव पुन्हा वाढू नये यासाठी सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here