अतिवृष्टीचा इशारा; मुंबई, ठाणे आणि कोकणातील शाळांना सुट्टी

0
229

शनिवारपासून मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या अस्मानी संकटामुळे मुंबईची दाणादाण उडाली आहे. त्यातच हवामान खात्याने आज अतिवृष्टीचा इशारा दिल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिवाय हवामान खात्याने आज मुंबईत अतिवृष्टीचा इशारा दिल्याने शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण असल्याने येत्या ८ सप्टेंबरपर्यंत राज्यातील बहुतांश भागात पाऊस सक्रिय राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने आज मुंबई, नवी मुंबई, कोकण आणि ठाण्यातील सर्व सरकारी आणि खासगी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात येत असल्याचं शेलार यांनी ट्विटवरून जाहीर केलं आहे. राज्यातील इतर भागांतील पावसाची परिस्थिती पाहून तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना सुट्टी द्यायचा निर्णय घ्यावा असेही शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

मुंबईत ऑरेंज अलर्ट जारी

हवामान विभागाकडून मुंबईत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांना समुद्र किनारी न जाण्याचं प्रशासनाने आवाहन केले आहे. पावसामुळे मुंबईतील रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. मध्य, वेस्टर्न आणि हार्बर रेल्वे दहा ते १५ मिनिटे उशिराने धावत आहे. तर वेस्टर्न आणि इस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक संथगतीने सुरू आहे. मुंबईसह ठाणे, भिवंडी, कल्याण, नवी मुंबई, वसई, दादर आणि पालघर या भागात पावसाचा जोर कायम आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here