अजितदादांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी; नितेश राणे यांनी व्यक्त केल्या भावना

0
59

बारामती: महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले आहे. आज भाजप आमदार व मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी बारामती येथे जाऊन पवार कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी दिवंगत अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

पवार कुटुंबीयांचे सांत्वन

नितेश राणे यांनी बारामती येथील निवासस्थानी जाऊन पार्थ पवार यांची भेट घेतली. अजितदादांच्या निधनामुळे पवार कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात सहभागी होत त्यांनी धीर दिला. “पवार कुटुंबीयांवर कोसळलेल्या या दुःखातून सावरण्याचे बळ त्यांना मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना,” अशा शब्दांत राणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

फेसबुक पोस्टमध्ये मंत्री नितेश राणे म्हणाले

भेटीनंतर नितेश राणे यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत अजितदादांच्या कार्याचा गौरव केला. त्यांनी म्हटले की, “महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे.”

“अजितदादांच्या निधनामुळे राज्याने एक कणखर नेतृत्व गमावले आहे. आज बारामती येथे जाऊन स्व. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आणि पार्थ पवार यांची भेट घेऊन सांत्वन केले.” – नितेश राणे (मत्स्य व बंदर विकास मंत्री )

राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त

अजित पवार यांच्या निधनानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. प्रशासनावरील पकड आणि कामाचा धडाका यांमुळे ‘दादा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या नेतृत्वाच्या जाण्याने बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाल्याची भावना राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here