अकांऊट खाते रिन्युव्हल करून देतो असे सांगून खात्यातील तब्बल ३९,९९७ रक्कम मोबाइलद्वारे ऑनलाईन काढून घेतली

0
367

सिंधुदुर्ग -अकांऊट खाते रिन्युव्हल करून देतो असे सांगून खात्यातील तब्बल ३९,९९७ रक्कम मोबाइलद्वारे ऑनलाईन काढून घेतल्याचा प्रकार सौंदाळे येथील पुजा जयवंत मिठबांवकर या महिलेच्या बाबतीत घडला असून तिच्या तक्रारीवरून फसवणूक केल्याप्रकरणी विजयदूर्ग पोलिसांनी सौरभकुमार या व्यक्तिवर गुन्हा दाखल केला आहे.त्यांनी बँक ऑफ बडोदा या बँकेचा मॅनेजर बोलत आहे अशी बतावणी करून महिलेला फसविल्याने सौंदाळे परिसरात खळबळ उडाली आहे.

सौंदाळे साईनगर येथील पुजा जयवंत मिठबांवकर(२२) या महिलेने विजयदूर्ग पोलिस स्थानकात याबाबत तक्रार दिली यामध्ये दि. १० ऑगस्ट रोजी दुपारी १.०५ वा सुमारास त्यांना मोबाईलवर कॉल आला.यावेळी समोरील व्यक्तिने आपण बँक ऑफ बडोदा बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स या बँकेचा मॅनेजर सौरभकुमार बोलत असल्याने त्यांनी सांगीतले.

त्यांनी मिठबांवकर यांना बँक ऑफ बडोदा या बँकेचे तुमचे अकांऊट रिन्युव्हल करण्याची मुदत संपली असून ते रिन्युव्हल करणेकरीता अकांऊट नंबर, डेबीट कार्ड नंबर, सीव्हीव्ही नंबर घेतले व मोबाईलवरून मेसेज पाठवून त्या मेसेजचा ओटीपी नंबर घेवून त्यांचा बँक ऑफ बडोदा शाखा ऐरोली इनथन या शाखेच्या अकांऊटमधील रक्कम ३९,९९७ रूपये रक्कम काढून ऑनलाईन फसवणूक केली अशी तक्रार दिली. या तक्रारीवरून विजयदूर्ग पोलिसांनी सौरभकुमार याचेविरूध्द भादवि ४१९, ४२०, माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६(क) (ड) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here