सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; हा पक्षाचा अंतर्गत विषय – शरद पवार

0
33

मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात घडामोडींना वेग आला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. खासदार सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात तसेच सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

दुपारी बैठक, संध्याकाळी शपथविधी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची आज दुपारी बैठक होणार आहे. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर संध्याकाळी लोकभवन येथे त्यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी पार पडणार आहे.

शरद पवार काय म्हणाले?

या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले,
“सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत मला कोणतीही अधिकृत माहिती नाही. त्या शपथ घेणार असल्याचं वाचनात आलं आहे. त्यांच्या पक्षाने हा निर्णय घेतलेला दिसतो. हा पूर्णपणे पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे.”

सरकार स्थिर, धोका नाही – काँग्रेस

दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारच्या स्थैर्यावर भाष्य करताना सांगितले, “या सरकारकडे स्पष्ट बहुमत आहे. बहुमताच्या पलीकडे हे सरकार आहे. त्यामुळे सरकारला कोणताही धोका नाही. अशा परिस्थितीत पुढे जाण्याची घाई का आहे, यावर मी काही बोलू शकत नाही.”

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धावपळ

एकीकडे राज्य पातळीवर सत्ता-समीकरणांमध्ये बदल होत असतानाच, दुसरीकडे महानगरपालिकांमध्ये महापौर आणि उपमहापौर निवडींची प्रक्रिया वेग घेत आहे. तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा प्रचारही लवकरच जोरात सुरू होण्याची शक्यता आहे.राज्यातील या सर्व घडामोडींमुळे राजकीय वातावरण तापले असून, आजच्या शपथविधीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here