सिंधुदुर्ग – महाराष्ट्रातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 7 फेब्रुवारीला निकाल जाहीर केला जाणार आहे. दरम्यान,सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवडणुकीपूर्वीच महायुतीच्या 25 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. विशेषतः कोकणात महायुतीने मोठी आघाडी घेत तब्बल 25 जागा बिनविरोध जिंकल्या आहेत.
पालकमंत्री तथा मंत्री नितेश राणे यांच्या प्रभावी राजकारणाचे चित्र यामधून स्पष्ट झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत 8 आणि पंचायत समित्यांमध्ये 17 जागा महायुतीने बिनविरोध जिंकल्या आहेत.
50 सदस्यांच्या जिल्हा परिषदेत भाजपचे 7 आणि शिंदे गटाचा 1 सदस्य बिनविरोध विजयी झाला आहे. 100 सदस्यसंख्या असलेल्या पंचायत समित्यांमध्ये भाजपचे 16 आणि शिंदे गटाच्या शिवसेनेचा 1 सदस्य बिनविरोध निवडून आला आहे.
महायुतीचे बिनविरोध विजयी उमेदवार
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद (8 बिनविरोध)
1. खारेपाटण – प्राची इस्वालकर (भाजप)
2. बांदा – प्रमोद कामत (भाजप)
3. जाणवली – रुहिता राजेश तांबे (शिवसेना – भाजप समर्थित)
4. पाडेल – सुयोगी रविंद्र घाडी (भाजप)
5. बापर्डे – अवनी अमोल तेली (भाजप)
6. पोंगुर्ले – अनुराधा महेश नारकर (भाजप)
7. किंजवडे-सावी – गंगाराम लोके (भाजप)
8. कोळपे – प्रमोद पुंडलिक रावराणे (भाजप)
पंचायत समिती – कणकवली (6 बिनविरोध)
1. वरवडे – सोनू सावंत (भाजप)
2. नांदगाव – हर्षदा हनुमंत वाळके (भाजप)
3. जाणवली – महेश्वरी महेश चव्हाण (भाजप)
4. बिडवाडी – संजना संतोष राणे (भाजप)
5. हरकुळ बुद्रुक – दिव्या दिनकर पेडणेकर (भाजप)
6. नाटळ – सायली संजय कृपाळ (भाजप)
देवगड तालुका पंचायत समिती (4 बिनविरोध)
1. पाडेल – अंकुश यशवंत ठुकरूळ (भाजप)
2. नाडण – गणेश सदाशिव राणे (भाजप)
3. बापर्डे – संजना संजय लाड (भाजप)
4. फणसगाव – समृद्धी संतोष चव्हाण (भाजप)
इतर पंचायत समित्या (बिनविरोध)
• वैभववाडी – कोकिसरे : सौ. साधना सुधीर नकशे (भाजप)
• वेंगुर्ले – आसोली : संकेत धुरी (भाजप)
• मालवण – अडवली मालडी : सीमा सतीश परुळेकर (भाजप)
• सावंतवाडी – शेरले : महेश धुरी (भाजप)
• दोडामार्ग – कोलझर : गणेश प्रसाद गवस (शिंदे गट, शिवसेना)



