सिंधुदुर्गातील वाढत्या यांत्रिक शेतीमुळे ग्रामीण पशुधनात होतेय घट

0
217

सिंधुदुर्ग – यांत्रिक शेतीमुळे पारंपरिक बैल जोडीसह औत धरून शेती करण्याकडील कल अलीकडे कमी होऊ लागला आहे. यामुळे ग्रामीण भागातील पशुधनात होताना दिसत आहे. यामध्ये प्रामुख्याने बैल आणि रेड्यांची संख्या झपाट्याने कमी होताना दिसत आहे. गायींची संख्याही कमी होत असल्याचे चित्र आहे.

एकेकाळी साधारणतः घरोघरी दुभते जनावर होते. त्यामुळे घरचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ यांची रेलचेल होती. त्यामुळे ग्रामीण भागात जणू गोकुळ नांदत होते. शेतकरी गुरांबरोबर रममाण होताना दिसत होते. भातशेती करताना प्रामुख्याने नांगर ओढण्यासाठी बैल किंवा रेड्याचा वापर होत असे. पावसाळ्यात सर्वत्र शेत नांगरणी करताना बैलजोडीचा वापर केला जात असल्याचे चित्र होते; मात्र यामध्ये आता यांत्रिक शेतीचा शिरकाव झाला. सहज उपलब्ध होत असल्याने तसेच वापरण्यास सुलभ शेती यंत्रणा उपलब्ध होत असल्याने शेतकरी नागंरणीसाठी यंत्राचा वापर करताना दिसत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही आता शेतीमध्ये बैलजोडी ऐवजी यंत्राचा वापर होत आहे.

शेतीचा हंगाम संपल्यावर बैल किंवा रेडा जोडी चा वर्षभर सांभाळण्याचा खर्च परवडत नाही. तसेच एकत्रित कुटुंब पद्धती लोप पावत चालल्याने अलीकडे शेतकरी यांत्रिक शेतीकडे वळला आहे. यामुळे कामे पटकन उरकण्यासह अन्य काही खर्च नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील पशुधन कमी होत आहे. जनावरे चरण्यासाठी सोडण्याच्या जागाही आता बागांनी व्यापल्याने चाऱ्याचा मोठा प्रश्‍न आहे. त्यामुळे दुग्धोत्पादनात अडचणी जाणवतात. खर्चाच्या तुलनेत दुधाचे प्रमाण नसल्याने शेतकरी पारंपरिक पद्धत सोडून संकरित गायींच्या पालनाकडे वळत आहेत. देवगड सारख्या तालुक्यात पशुधनात बैल आणि रेड्यांची संख्या घटली आहे. दुग्धोत्पादन जनावरे बाळगली जात आहेत. त्यामुळे दुध उत्पादन स्थिर असल्याचे सांगितले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here