रत्नागिरीत खळबळ: विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या प्राध्यापकावर ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल

0
13

रत्नागिरी: रत्नागिरी शहरातील एका नामांकित महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी संबंधित प्राध्यापका विरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेने शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. संशयित प्राध्यापकाने पीडित विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या असहायतेचा फायदा घेतला आणि वेळोवेळी अत्याचार केले. या गंभीर प्रकारानंतर पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी त्वरित कारवाई करत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास शहर पोलीस करत असून, एका नामांकित संस्थेत घडलेल्या या प्रकारामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here