लोकमान्य बाल गंगाधर टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेश सोहळ्याला 125 वर्षांची पूर्ती झाली असून हिंदू धर्मातील एक प्रमुख सण म्हणजे गणेश उत्सव मानला जात आहे. आणि महाराष्ट्रातील हा सर्वात मोठा आणि महत्वाचा सण मानला जातो. या सणाची भव्यता खऱ्या अर्थाने कोकणात, पश्चिम महाराष्ट्रात तसेच जवळील परिसरात पाहावयास मिळते. याच धर्तीवर पनवेल तालुक्यातही गणेशाचे जल्लोषात आगमन केले जाते, यावर्षी पनवेल तालुक्यात तब्बल ३७ हजार २०१ घरगुती गणपतींसह ३२४ सार्वजनिक गणपती विराजमान होणार आहेत.
गणेश चतुर्थी भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा धाकटा मुलगा श्री गणेशाच्या जन्माचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. गणपती एक पूजनीय देव आहे जो जीवनात समृद्धी आणि आनंद आणतो. लोकमान्य’ बाल गंगाधर टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला 125 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांनी गणेशोत्सव हा एक प्रमुख सामाजिक आणि सार्वजनिक असा सण साजरा करून एकता टिकून राहण्यासाठी प्रयत्न केला. मुस्लिम-हिंदू (मोगल-मराठा) युद्धांनंतर श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून प्रायोजित झाल्यानंतर १९ व्या शतकात पुन्हा एकदा बाल गंगाधर टिळकांनी सर्व तुटलेल्या हिंदू समुदायाला बांधण्याचे व ब्रिटिश सरकारच्या हिंदू संमेलनावरील बंदीला विरोध दर्शविण्याचे साधन म्हणून सर्वांना एकत्र आणण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमाची रूपरेषा आखली. बाळ गंगाधर टिळक यांनी उत्सवाला लोक चळवळीचे कारण बनविले जेणेकरुन सर्व समाजातील लोक भाग घेऊ शकतील आणि त्या काळी भारतात इतके प्रचलित असलेले जातीभेद कमी होतील.
आजही बाळ गंगाधर टिळक यांच्या विचार प्रणालीनुसार सर्वत्र गणेशोत्सव सुरु असताना जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून सर्व भारतीय एक होऊन या उत्सवात सहभागी होत असतात. संपूर्ण कोकणातील गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना विचारात घेतल्यास ती कोटींच्या घरात जाऊ शकते. कारण फक्त एकाच तालुक्यात हजारोंच्या संख्येने मूर्तींची प्रतिष्ठापना होत असेल तर मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, कल्याण-डोंबिवली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आकडा हा कोटींच्या घरी उड्डाणे करू शकतो. पनवेल तालुक्यात एकूण ७ पोलीस ठाणे कार्यरत आहेत आणि या ७ पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रावर पनवेल तालुका आहे, त्यामुळे गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येत असल्याच्या नोंदी या पोलीस ठाण्यामध्ये उपलब्ध होत असतात, यामध्येही सार्वजनिक गणेश मंडळांची नोंद अगदी बरोबर असते, मात्र घरगुती गणपतींचा आकडा त्यांच्याकडेही अंदाजानुसार असतो, कारण प्रत्येक नागरिक घरगुती गणपतींची परवानगी काढण्याचा प्रश्नच उद्भवत नाहीत. आज पनवेल तालुक्यातील पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ७७०० घरहूती तर ३१ सार्वजनिक गणपतींची स्थापना होणार असल्याचा आकडा उपलब्ध होत आहे. तसेच तालुका पोलीस ठाण्यामध्ये ६५७५ घरगुती तर २० सार्वजनिक, खांदेश्वर पोलीस ठाण्यामध्ये ६४५० घरगुती तर ५५ सार्वजनिक, कामोठे येथे ४६०० घरगुती तर ९० सार्वजनिक, कळंबोली येथे ३६०० घरगुती तर ४७ सार्वजनिक, तळोजा येथे १७७६ घरगुती तर २१ सार्वजनिक, खारघर येथे ६५०० घरगुती तर ६० सार्वजनिक गणेश मूर्तींची स्थापना करण्यात येत असल्याची नोंद आहे.
(सौजन्य: www.sahajshikshan.com )



