सिंधुदुर्ग – गव्याने एका रिक्षेला धडक दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असल्याचे सांगितले जात आहे. मात्र हि केवळ अफवा आहे. तो व्हिडीओ सिंधदुर्ग मधील नाही असे स्पष्टीकरण वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांनी दिले आहे.
सोशल मीडियातून व्यक्त होणाऱ्या अंदाजानुसार काहींच्या मते हा व्हिडीओ सावंतवाडी तालुक्यातील असनिये येथील आहे. तर काहींच्या मते हा व्हिडिओ राधानगरी फोडा येथील आहे. मात्र, या व्हायरल व्हिडीओची सत्यता पडताळून पाहिली असता, तसेच वनविभागाशी सर्पक केला असता हा व्हिडीओ कर्नाटक किंवा केरळ येथील असल्याचे स्पष्टीकरण वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांनी दिले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अध्या गवा रेड्यांचा धुमाकूळ सुरु आहे. मध्यंतरी आंबोली आजरा मार्गावर कारला धडक दिली तर माजगाव सावंतवाडी मार्गावर गवा रेड्याने कारला दिलेल्या धडकेत अनेक जण जखमी ही झाले होते. त्या पार्श्वभूमीवर समोर आलेल्या या व्हिडीओमुले सर्वचजण अवाक झाले हा व्हिडिओ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असावा असेच सर्वाना वाटू लागले.
दरम्यान सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांना विचारले असता त्यांनी हा व्हिडीओ सावंतवाडी तालुक्यात असनिये भागातील नाही. अशी कोणतीही घटना तेथे घडल्याची माहिती अद्याप प्राप्त झाली नाही असे सागितले. तसेच अफवांवर विश्वास ठेऊ नये असेही म्हटले आहे.



