उन्हाळी सुट्ट्यांसाठी कोकण रेल्वे मुंबई-मडगाव विशेष ट्रेन चालविणार

0
6

सिंधुदुर्ग – एप्रिलच्या सुरुवातीला सुट्ट्यांचा कालावधी आणि पर्यटन हंगाम लक्षात घेता मुंबई ते मडगावदरम्यान विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे.

गाडी क्रमांक ०११२९ मुंबई सीएसएमटी- मडगाव जंक्शन विशेष ही गाडी ३ एप्रिल व ५ एप्रिल रोजी रात्री १२:२० वाजता सीएसएमटी येथून सुटेल. मार्गात विविध स्थानकांवर थांबे घेत ही गाडी त्याच दिवशी दुपारी ३:१५ वाजता मडगाव जंक्शन येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक ०११३० मडगाव जंक्शन सीएसएमटी विशेष ही गाडी ३ व ५ एप्रिलला सायंकाळी ४:०० वाजता मडगाव येथून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे ३:४५ वाजता मुंबई सीएसएमटी येथे दाखल होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here