अजितदादांचे निधन आणि विलीनीकरणाचा वाद; भाजपने पवारांना घेरले !

0
5

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात ‘राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण’ हा विषय कळीचा ठरला आहे. या प्रकरणावरून आता सत्ताधारी भाजप आणि शरद पवार गट यांच्यात कलगीतुरा रंगला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शरद पवारांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतले आहेत.

भाजपचे शरद पवारांना ‘अस्वस्थ’ करणारे प्रश्न

भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोशल मीडियाद्वारे शरद पवारांवर टीकेची झोड उठवली आहे. त्यांनी पवारांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ६ गंभीर प्रश्न विचारले आहेत:

घाई कशासाठी?: अपघाताच्याच दिवशी विलीनीकरणाची चर्चा सुरू करण्याची घाई का झाली? राष्ट्रवादीकडून अशी कोणतीही अधिकृत मागणी नसताना हा विषय कोणी पुढे आणला?

राजकीय हतबलता: विलीनीकरणाचा आग्रह ही पवार गटाची राजकीय हतबलता आहे का?

भूमिकेचे काय?: ज्या ‘धर्मनिरपेक्ष’ भूमिकेचा शरद पवार नेहमी उल्लेख करतात, ती भूमिका विलीनीकरणाच्या चर्चेवेळी बाजूला सारली गेली का?

मविआचे भवितव्य: जर दोन्ही गट एकत्र येणार होते, तर महाविकास आघाडी आणि युपीएचे भवितव्य काय असते, हा प्रश्न मित्रपक्षांना का पडला नाही?

नैतिक उंचीचा अभाव: “सध्या राजकारण नको, मी सुनेत्रा पवारांच्या पाठीशी खंबीर आहे,” अशी परिपक्व भूमिका शरद पवारांनी का घेतली नाही?

‘इकोसिस्टीम’वर टीका

केशव उपाध्ये यांनी पवारांच्या समर्थनार्थ बोलणाऱ्या यंत्रणेवर (Eco-system) टीका करताना म्हटले की, शरद पवार जे बोलतात ते सत्य म्हणून पाजळले जाते, पण यावेळी पवारांनी संयम पाळण्याऐवजी राजकारणाला प्राधान्य दिले. सुनेत्रा पवार आणि भाजपला लक्ष्य करून जबाबदारीपासून पळ काढण्याचा हा प्रकार असल्याची टीका भाजपने केली आहे.

अजित पवारांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या राजकीय पोकळीत आता ‘विलीनीकरण’ विरुद्ध ‘भाजपचे सवाल’ असा नवा संघर्ष पाहायला मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here