२९ सप्टेंबर रोजी जिल्हा बँकेची ३८ वी सर्वसाधारण सभा होणार संपन्न जिल्हा बँकेला २०२०-२१ सालासाठी ऑडिट वर्ग ‘अ’ प्राप्त जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांची माहिती

0
42

सिंधुदुर्ग – जिल्हा बँकेचा कोविड कालावधी असतानाही नफा वाढत आहे. त्याचा फायदा बँकेच्या लाभांश संस्थांना होत आहे. बँकेची व्यवसाय उलाढाल ५ हजार कोटींकडे चालली आहे. अशी माहिती जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली आहे.

सन २०२०-२१ मध्ये लेखा परीक्षण बँक ऑडिट वर्ग “अ” प्राप्त झालेला आहे. शेतकरी व सर्व सामान्य लोकांसाठी विविध कर्ज योजना बँकेने आणल्या आहेत. त्यामुळे देशातील सहकार क्षेत्रात सिंधुदुर्ग बँक अग्रगण्य राहील.

आजपर्यंत बँकेवर कोणालाही एकही आरोप करता आला नाही, तशीच कामगिरी पुढील काळात जिल्हा बँक करेल, असे सतीश सावंत म्हणाले.

तसेच सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेची उद्या २९ सप्टेंबर रोजी ३८ वी सर्वसाधारण सभा होणार असल्याची माहितीही सतीश सावंत यांनी दिली. यावेळी बँक संचालक आर. टी. मर्गज व बँक अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा बँक संचालक व प्रशासनाने जे काम केले त्याला यश आले आहे. बँक राज्यात नावारुपास आली आहे. सातारा व अकोला बँकेने आमचे काम पाहिले. १५ लाख कर्ज देण्याचे अधिकार बँक व्यवस्थापकांना देण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील बँकिंग व्यवसायातील ३९ टक्के बँक व्यवसाय झाला आहे. स्व निधी २७० कोटी आहे. ५ हजार कोटींकडे व्यवसायाची वाटचाल झाली आहे. सी. डी. रेशो ६७.९२ टक्के झाला आहे. बँकेला ६२ कोटी ९२ लाख ढोबळ नफा तर निव्वळ नफा १४ कोटी झाला आहे, असे सतीश सावंत यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here