27.1 C
Panjim
Saturday, November 26, 2022

स्वँब मशीन साठी भाजपतर्फे एक कोटी- विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आमदार निधीची पत्रे जिल्हाधिकाऱ्याकडे सुपूर्त; सरकार अपयशी ठरले

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

 

सिंधुदुर्ग – रत्नागिरी या दोन जिल्ह्यात कोरोना रोखण्यासाठी सरकार अपयशी ठ रले आहे.कोकणातील लोकांच्या जीववर शिवसेना मोठी झाली.त्या चाकरमानी आणि गाववल्यामध्ये शिवसेनेने वाद लावले असल्याचा आरोप विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यानी केला.तसेच भाजपतर्फे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्याकडेच स्वँब मशीनसाठी एक कोटींचा आमदार निधीची पत्रे दिल्याचे जाहीर केले.

कणकवली नगरपंचायत सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सोबत आ.निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष राजन तेली,प्रमोद जठार, जि. प.अध्यक्ष समिधा नाईक,बँक संचालक
अतुल काळसेकर,भाजप महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, आदी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोना साथीचा आढावा घेतला आहे.हे सरकार कोरोना हाताळायला अपयशी ठरले. जनतेचा संताप होत आहे,उद्रेक आहे.भाजपच्या आंदोलन निषेधार्थ उद्या करणार आहोत.कोकणात कोरोना नव्हता. गावकरी व चाकरमानी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला.स्कॉरटांईन करण्यासाठी जागा कमी पडते म्हणून जाऊ नका,मुख्यमंत्री सांगतात हे दुदैव असल्याचे ना.प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

भाजपचे कोकणातील आमदार अडीच कोटी कोरोना रोखण्यासाठी देत आहेत,असेही ना.दरेकर म्हणाले. राणेंच्या हॉस्पिटलमध्ये कोविड १९ तपासणी देण्यास पालकमंत्री टाळाटाळ करत आहेत.केवळ पालकमंत्री राजकारण करुन जनतेची दिशाभूल करत आहेत.
एक कोटी 30 लाख आम्ही निधी देत आहोत,ती पत्रे भाजपच्या कोकणातील आमदारांनी दिली आहेत.जोपर्यंत स्वँब सेंटर आठवड्यात उभे राहिल्याशिवाय प्रमोद जठार परत जाणार नाहीत. कोकणातील रायगड,रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्हातील आमचा कोकण दौरा कामी आला असल्याचा दावा विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केला.

चाकरमान्याची व्यवस्थेत सरकार कमी पडले. कोकणातील जनतेवर या सरकारने अन्याय केला. राणे यांच्याबद्दल पालकमंत्री बोलले,राणेंना डावलून दरेकर यांचा दौरा आहे.मुळात आम्ही राणेच्याच हॉटेलमध्ये उतरलो. राणेचें ऑपरेशन असल्याने नितेश राणे आले नाहीत.आमच्यात वाद करून शिवसेनेच्या हाती काही लागणार नाही. कॉरटांईन आम्हाला करायला पाहिजे,मग रत्नागिरी येथे १०० पेक्षा जास्त रुग्ण असताना रोज पालकमंत्री ये जा करतात.हे कशाचे उदाहरण आहे? सिंधुदुर्ग जिल्ह्यात आमची ताकद आहे,आम्ही काळजी घेऊ,रत्नागिरी जिल्हाची काळजी तुम्ही करा.अपयश झाकण्यासाठी पालकमंत्री बेताल वक्तव्य करत असल्याचे दरेकर यांनी म्हणाले.

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Our Channel

YouTube player

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung hero

YouTube player

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img