सिंधुदुर्ग जिल्ह्यात डॉक्टरांचे काळी फीत लावून निषेध आंदोलन सुरु जिल्ह्यात 100 टक्के प्रतिसाद

0
144

 

फेसबुकवर मालवण येथील डॉ. विवेक रेडकर,आणि वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बद्दल बदनामीकारक व चिथावणीखोर पोस्ट टाकणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध म्हणून सिंधुदुर्गातील डॉक्टरनि काळे फीत आंदोलन सुरू केले आहे.सिंधुदुर्गात सुरु असलेल्या या आंदोलनाला १०० टक्के प्रतिसाद मिळाला आहे.

कोरोना च्या पार्श्वभूमीवर स्वतःचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय सेवा देणाऱ्याना ठेचून मारण्याची धमकी देणाऱ्या प्रवृत्ती बद्दल वैद्यकीय व्यवसायिका मध्ये तीव्र संताप आहे.अश्या प्रवृत्तीचा प्रशासनाने योग्य वेळी बंदोबस्त करावा व कायद्याच्या माध्यमातून शिक्षा दयावी अशी मागणी होत आहे.

आज सुरु असलेल्या आंदोलना मध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन(IMA),डॉक्टर्स फॅट र्निटी क्लब(DFC),असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडिया ,सर्जन असोसियएशन ऑफ इंडिया,पॅरा मेडिकल स्टाफ यांचा समावेश आहे.रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्ह्यातील अत्यावश्यक वैद्यकीय सेवा चालू ठेवली आहे.अश्या समाजातील प्रवृत्ती वर जिल्हा प्रशासन काय कारवाई करते याकडे वैद्यकीय व्यावसायिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here