सिंधुदुर्ग जिल्हा स्तर 4 मध्ये समाविष्ट; प्रभारी जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांचे आदेश

0
28

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात आरटीपीसीआर टेस्ट केलेल्या कोविड बाधित रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट हा 12.7 टक्के असुन सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र शासनाकडील स्‍तररचनेनुसार चौथ्या स्तरामध्ये समाविष्ट होत आहे. जिल्ह्याकरिता 28 जून, 2021 रोजी सकाळी 7 वाजलेपासून चौथ्या टप्प्याचे सुधारीत आदेश लागू केले आहेत, असे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी दिली.

या आदेशात म्हटले आहे, अत्यावश्यक सेवेशी संबंधीत सर्व दुकाने, आस्थापना यांच्या वेळा सर्व दिवशी दुपारी 4 वा. पर्यंत सुरु राहतील. अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने व आस्थापना यांच्या वेळा सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील. शनिवार व रविवार बंद राहतील. मॉल्स, सिनेमा हॉल (मल्टी प्लेक्स व सिंगल स्क्रिन सह), नाटयगृह बंद राहतील. रेस्टॉरंटस सोमवार ते शुक्रवार (Weekdays) सायंकाळी 4 वाजेपर्यंत 50 टक्के आसन क्षमतेनुसार तर सायंकाळी 4 नंतर पार्सल सेवा चालू राहील, असे नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here