सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाच्या गेटवर शुक्रवारी भाजपचे लक्षवेध आंदोलन – जिल्हाध्यक्ष राजन तेली

0
105

सिंधुदुर्ग – जिल्हा सत्ताधारी पूर्णतः अपयशी ठरलेले आहेत. धोरणामुळे मृत्यूंची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. भारतीय जनता पार्टीने गेले काही महिने प्रशासन व सत्ताधाऱ्यांना सहकार्य म्हणून शांत राहण्याची भूमिका घेत आम्ही गप्प बसलो होतो.गेल्या दोन महिन्यापासून बंद ठेवून व्यापारी आणि सर्वसामान्य लोकांचे नुकसान करण्यात आले. मात्र कोरोनावर नियंत्रण आणण्यात सत्ताधारी व प्रशासनाला अपयश आले आहे. सिंधुदुर्गात दोन वेळा मुख्यमंत्री येऊन देखील उपयोग झालेला नाही.त्यामुळे राज्यातील ठाकरे सरकारला जाग आणण्यासाठी उद्यापासून लक्षवेध अभियानाचा सुरुवात जिल्हा रुग्णालयाच्या गेटवर दोन तास आंदोलन करून करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली. कणकवली येथून ऑनलाइन पद्धतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here