21 C
Panjim
Saturday, January 28, 2023

सिंधुदुर्गात विद्यार्थी दिवाळीच्या सुट्टीत उभारताहेत किल्ले कोकणातील परंपरा आजही कायम

- Advertisement -spot_img

सिंधुदुर्ग – दिवाळी निमित्त सध्या जिल्ह्यात विद्यार्थी वेगवेगळे आकर्षक किल्ले बनवण्याचा आनंद घेत आहेत. कोरोना आणि लाॅकडाऊनमुळे मुलांना घरा बाहेर पडणं मुश्किल झालं होतं माञ आता दिवाळी निमित्ताने मुले एकञ येऊन किल्ले बनवण्याचा आनंद घेत आहेत. कुडाळ नाबरवाडीतील विद्यार्थ्यांनी अशीच एक आकर्षक पन्हाळा किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे. शिवाजी महाराज दरबारात सिंहासनावर बसलेले यात दाखवण्यात आले आहेत. गडाच्या सभोवतारी

पेटते मशाली आणि ध्वनीक्षेपकाणे पन्हाळ्याचा इतिहास सांगतेवेळी यात जिवंत पणा जानवत आहे. त्याशिवाय दिव्यांचा झगमगाट आणि आकर्षक किल्ला सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

महाराष्ट्र संस्कृतीत गडकोटांना प्राचीन स्थान आणि महत्त्व आहे. हे गडकिल्ले म्हणजे पराक्रम आणि संघर्षाची ही प्रतीके आहेत. दिवाळीत किल्ल्यांच्या प्रतिकृती उभारण्याचा लहान मुलांचा सुट्टीतील विरंगुळा जणू परंपराच बनली आहे. दिवाळीतील किल्ले बनविण्याची परंपरा ही पूर्वजांनी आपल्या गौरवशाली इतिहाच्या जवळ जाण्यासाठी निर्माण केलेली एक संधी आहे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगातही दिवाळीत किल्ले उभारण्याची परंपरा कायम आहे. असे जाणकार सांगतात.

सिंधुदुर्ग जिल्ह्यासह लगतच्या गोवा राज्यात दिवाळीत किल्ले बनविण्याची परंपरा आहे. इतिहासाच्या परंपरेला उजाळा देताना येथील तरुणाईच्या मनात या निमित्ताने संस्काराच्या बीजाचे रोपण करण्याची भावनादेखील या मागे असल्याचे कोकणातील जाणकार सांगतात.

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Our Channel

YouTube player

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung hero

YouTube player
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles