सिंधुदुर्गात वाढीव वीजबिलाविरोधात भाजपाचे

0
149

सिंधुदुर्ग – भारतीय जनता पक्षाच्यावतीने वाढीव वीजबिलाच्या प्रश्नावरून आज जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांनी कुडाळ महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला.कोरोना काळात वाढीव वीजबिलामुळे जनतेची आर्थिक लुटमार होत आहे. त्यामुळे नागरिकांना वीजबिलात सवलत मिळालीच पाहिजे. वीज बिले भरण्यासाठी सक्तीचे राबवलेले धोरण आम्ही जिल्ह्यात चालू देणार नाही,असा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला आहे.तसेच यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. परिस्थिती जास्त चिघळू नये म्हणून नंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.

भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यावेळी म्हणाले कोरोना काळात वाढीव वीज बिलात सवलत देण्याची घोषणा ऊर्जा मंत्र्यांनी केली होती.मात्र आता तेच ऊर्जामंत्री वीज बिल माफ होणार नाही,असे सांगून जनतेची फसवणूक करत आहेत.त्यामळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. तसेच महावितरण प्रशासन हे ऊर्जामंत्र्यांच्याआदेशाने मनमानी कारभार करत आहेत. हे सक्तीचे राबविलेले धोरण जास्त काळ टिकू देणार नाही,असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.यावेळी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाढीव वीजबिलावमध्ये सूट देण्याच्या आश्वासनावरुन उर्जामंत्री नितीन राऊत यांनी घूमजाव केल्यानंतर राज्यात नागरिकांत नाराजी आहे. भाजप नेत्यांकडूनही महाविकास आघाडीवर जोरदार टीका होत आहे. दरम्यान, कुडाळ येथील भाजप कार्यकर्त्यांनीही सरकाकरच्या वीजबिलाविषयीच्या धोरणाविरोधात महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोर्चादरम्यान कार्यकर्त्यांनी सरकावरविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच, कोरोनाकाळात आलेल्या वाढीव वीजबिलात सवलत मिळावी अशी मागणी आंदोलकांनी केली. आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. आंदोलनाचे नेतृत्व भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली केले.

यावेळी, कोरोना आणि लॉकडाऊनमुळे नागरिक आधीच आर्थिक संकटाला सामोरे जात आहेत. त्यात वाढीव वीजबिलामुळे जनतेची आर्थिक लूटमार होत आहे. त्यामुळे नागरिकांना वीजबिलात सवलत मिळालीच पाहिजे. वीजबिल न दिल्यामुळे जिल्ह्यातील कोणाचीही वीज कापण्यात येऊ नये. अशी मागणी भाजपने केली. तसेच, महावितरण प्रशासन ऊर्जामंत्र्यांच्या आदेशाने मनमानी करत आहे.विजबिले भरण्यासाठी सक्तीचे राबवलेले धोरण या जिल्ह्यात चालू देणार नाही, असा इशाराही भाजपने दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here