28.1 C
Panjim
Saturday, April 1, 2023

सिंधुदुर्गात पहिल्यांदाच विधवा महिलांचे हळदीकुंकू रोटरी क्लब आणि पदर प्रतिष्ठान यांच्या तिळगुळ समारंभात परिवर्तनाचे पाऊल

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

 

सिंधुदुर्ग – रोटरी क्लब आणि पदर प्रतिष्ठान कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या तिळगुळ वाटप समारंभात परिवर्तनाचे पाऊल टाकण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच यावेळी विधवा महिलांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या हळदी कुंकू घालून समाजाला एक नवा विचार देण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला आहे.

स्त्रीचे मन फक्त एक स्त्रीच जाणू शकते. या दृष्टिकोनातून या खास समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. खरंतर कधी पती नसलेल्या महिलांचे हळदीकुंकू या विषयावर मत जाणून घेण्याचा प्रयत्न कोणी केलेला दिसत नाही. उलट हळदी-कुंकू समारंभात विधवा महिलांना टाळून हेतूपुरस्कर अपमानीत केलं जातं का ? या महिलांना सन्मानाची वागणूक देणारा सण असू शकत नाही का ? कोणत्याही शुभ कार्यात या महिलांना पुढे येऊ दिले जात नाही. चुकूनमाकून ती त्या कार्यक्रमात पुढे आली तर तिच्यावर रागावलं जातं. तिनं असं अपमानीत जीवन का जगायचं ? अशा अनेक प्रश्नांवर रोटरी क्लब आणि पदर प्रतिष्ठानने विचारांती तिळगुळ समारंभात परिवर्तनाचे पाऊल टाकण्याचे ठरविले.

“नवरा असणे” हाच केंद्रबिंदू मानून आपण स्त्रियांचं मूल्यमापन करणार का ? खरं तर जास्तीत जास्त भावनीक गरज समाजात एकटं पडलेल्या स्त्रियांना असते. समाजाने त्यांना समजाऊन घ्यायला हवं. जेव्हा पुरुष अर्ध्यावर संसार टाकून जातो तेव्हा ती पदर खोचून जीवनसंघर्षात उतरते, चिल्ल्यापिल्ल्यांना सांभाळते. अशा महिलांना आधार देण्याचे टाळून आपण अनेक समारंभात त्यांना दूरच लोटतो हे काही मनाला पटणार नव्हतं म्हणून आम्ही विधवा महिलांचे हळदीकुंकू घालायचे ठरविले असे यावेळी रोटरीच्या अध्यक्ष वर्षा बांदेकर आणि पदर प्रतिष्ठानच्या अध्यक्ष मेघा गांगण यांनी सांगितले.

संक्रांतीनंतर कोकणात हळदी-कुंकू कार्यक्रम घरोघरी गल्ली-बोळात दिसतात.हळदी-कुंकू सण म्हणजे नवरा असणाऱ्या बायका नटून-थटून एकमेकींना हळदी-कुंकू लावतात व भेटवस्तू देतात. हे हळदी-कुंकू त्याच स्त्रियां लावतात ज्यांचे पती हयात असतात. या महिलांना सवाष्णी असे म्हणतात. मात्र ज्यांचे नवरे नसतात त्या महिलांना अपमानित करणारा हा सण असल्याचे आम्हाला वाटते असेही यावेळी या दोघांनी सांगितले.

या सोहळ्यात काही क्षण अत्यंत टिपण्याजोगे होते. एक वाहिनी तर अश्रू आवारू शकल्या नाहीत. आठवर्ष फक्त सौभाग्य लाभलं. पती गेले तेव्हा त्यांची धाकडी मुलगी अवघ्या दोन वर्षाची होती. तीन मुलांच भावाच्या मदतीने संगोपन केल. पण खोलवर झालेल्या आणि सांगता न येणाऱ्या जखमेवरची खपली अखेर निघाली. आपल्या दुखाला अश्रुणे वाट मोकळी करून देत तिने सर्वांचेच आभार मानले.

भारती नावाची एक महिला भडभडून बोलत होती, मुलगा सहा महिन्याचा असताना नवरा आजारपणाने गेला. स्मशानातली अर्धवट पेटलेली लाकडे आणून भात केला. अपार कष्ट करत मुलाला शिकवलं. आज आपल्याच महिला भगिनींनी तिचे कपाळ भरले. त्याचा तिला खूपच आनंद झाला.

पदर प्रतिष्ठानच्या अध्यक्ष मेघ गांगण सांगतात, सत्तरीतल्या आजींच्या डोकीला हळदिकुंकू लावताना मनावर दडपण आलेलं. त्यांची प्रतिक्रिया कशी असेल. पण त्यांनी सहज लावून घेतल हळदीकुंकू आणि पोटभरून आशीर्वाद दिला.खरतर आम्हाला हा कार्यक्रम घेताना अनेक प्रश्न पडलेले होते. आपल्या संस्कृतीत सर्वच सण खूप चांगले आणि उत्साहवर्धक आहेत. पण पुरूष प्रधान संस्कृतीने जाणूनबुजून विधवा महिलांना बंधनांच्या जोखडात बंद करून ठेवले आहे. अशावेळी समाजात काय चर्चा होईल. मात्र आम्ही सावित्रीच्या लेकी म्हणवतो, तीने शेण दगडधोंडे झेलले, समाजाला नवी दिशा दाखवली. आता आम्ही का सहन करायचे. कुंकू बाल संस्कार आहे, नवरा जाण्याचा त्याच्याशी काय संबंध. फुले तर निसर्ग देणगी आहे, ती कोणी माळावी कोणी माळू नये हे काही फुलावर लिहिले आहे का ? आमचा तो अधिकार आहे आणि आम्ही तो सोडणार नाही असेही त्या म्हणाल्या.

कणकवलीत पार पडलेल्या या कार्यक्रमात २०० हुन अधिक महिला सहभागी झाल्या. या अनोख्या सोहळ्याने आणि सन्मानाने महिला भारावून गेल्याचा अनुभव सर्वानीच यावेळी घेतला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच झालेल्या या परिवर्तनवादी कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Our Channel

YouTube player

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung hero

YouTube player
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles