22.1 C
Panjim
Friday, January 21, 2022

सिंधुदुर्गात थकीत पगारासाठी एसटी कामगारांचे आत्मक्लेश उपोषण एसटीच्या विभागीय कार्यालयासमोर केले उपोषण

Latest Hub Encounter

 

सिंधुदुर्ग – एसटी कामगारांचे जुलै,ऑगस्ट,सप्टेंबर महिन्याचे प्रलंबित असलेले वेतन राज्य सरकार देत नाही.एस. टि. महामंडळ राज्यसरकार पगाराचे पैसे देत नसल्याने कामगारांचे पगार देऊ शकत नाही. त्यामुळे शासनाला जाग यावी ,यासाठी आज सिंधुदुर्ग जिल्हयात मान्यताप्राप्त कामगार संघटनेच्या वतीने आत्मक्लेश उपोषण करण्यात आले.

कणकवली येथील एस. टि. च्या सुंधुदुर्ग जिल्हा विभागीय कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. कामगार संघटनेचे कामगार पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर स्वतःच्या व कुटुंबियांच्या जीवाची जोखीम घेऊन आपले कर्तव्य चोखपणे बजावणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना गेल्या काही महिन्यांपासून वेतनाचा प्रश्न सतावत आहे.महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने वेळोवेळी पत्रव्यवहार करून सदर परिस्थिती ही शासन व प्रशासन दरबारी मांडली आहे. तरीही सरकारने गांभीर्याने घेतलेलं नाही.एस.टी. कामगारांना ५० लाखाचे विमासंरक्षण दिले जात नाही.हवे असेल तर कागदपत्रे आणि अटी अशा लादल्या आहेत की त्यामुळे कामगार हौरणा झाला आहे.तीन महिन्या पासूनचे वेतन प्रलंबित असल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे.त्यामुळेआत्मक्लेश उपोषण आंदोलन विभागनियंत्रक कार्यालयासमोर कोविड चे सर्व नियम पळून आणि एसटी सेवा सुरळीत सुरू ठेवून केले जात आहे. हे आंदोलन मान्यताप्राप्त कामगार संघटनेचे विभागीय सचिव विनय राणे,अध्यक्ष सुरेंद्र मोरजकर,यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी खजिनदार अनिल नर,कार्याध्यक्ष प्रवीण कोंडरकर,मालवण आगाराचे कामगार संघटना अध्यक्ष काका खोत, मंगेश नानचे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना कामगार संघटनेचे मालवण एसटी डेपो अध्यक्ष काका खोत म्हणाले कि, आमचा पगार थकीत असून राज्य सरकार आमच्यावर अन्याय करत आहे. आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवणार आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -