25.9 C
Panjim
Monday, November 28, 2022

सिंधुदुर्गात चौथा कोरोना पॉझिटिव्ह, मुंबईहून आला गावी

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

 

सिंधुदुर्ग जिल्हय़ात आणखी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला असून कोरोना बाधित रुग्णांची संख्या चारवर पोहोचली आहे. आठवडाभरात तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्हय़ात खळबळ उडाली आहे. या सर्व रुग्णांचे ‘मुंबई कनेक्शन’ असल्याचेच स्पष्ट झाले आहे. कुडाळ तालुक्यातील जांभवडे येथील 27 वर्षीय युवक आईला सोडण्यासाठी मुंबईतील परळ येथून गावी आला होता. त्यानंतर तो कोरोना बाधित झाल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान जांभवडे गावचा तीन कि. मी. परिसर ‘कंटेनमेंट झोन’ घोषित करण्यात आला असून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी गुरुवारी दिली.

जिल्हय़ात 25 मार्च रोजी पहिला कोरोना बाधित रुग्ण सापडला. हा रुग्ण मेंगलोर एक्सप्रेसने कणकवली येथे येत असताना त्याला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. हा रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानंतर 29 एप्रिलला मुंबई येथून प्रवास करून आलेली 17 वर्षीय युवती कोरोना बाधित सापडली. त्यापाठोपाठ 4 मे रोजी आंबा वाहतुकीतील चालक कोरोना बाधित सापडला. आता आठवडाभरातच तिसरा कोरोना बाधित रुग्ण सापडला आहे. आतापर्यंत सापडलेले चारही कोरोना बाधित रुग्ण हे मुंबईहून प्रवास करून आले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गातील कोरोनाचे ‘मुंबई कनेक्शन’ वारंवार स्पष्ट झाले आहे.

कोरोना पॉझिटिव्ह सापडलेला चौथा रुग्ण हा मुंबईतील परळ येथून कुडाळ तालुक्यातील जांभवडे या गावी आईला सोडण्यासाठी आला होता. त्याच्यासोबत आईसह मावशी अशा एकूण तीन व्यक्ती होत्या. 28 एप्रिल रोजी सिंधुदुर्गात आल्यानंतर खारेपाटण येथील चेकपोस्टवर त्यांना थांबविण्यात आले व त्यांना थेट गावी न नेता जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले व तेथून त्यांना तात्काळ कुडाळ येथील शासकीय विश्रामगृहावर नेऊन संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले. त्यानंतर त्या युवकाचा व त्याच्या आईचा 5 मे रोजी स्वॅब घेण्यात येऊन कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल गुरुवारी प्राप्त झाला असून 27 वर्षीय युवक कोरोना पॉझिटिव्ह, तर त्याच्या आईचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तसेच अन्य दोघांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णावर आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत. तर युवकासोबत असलेल्या तिघांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे.

जिल्हय़ात कोरोना बाधित चार रुग्णांपैकी एक रुग्ण बरा होऊन घरी परतला आहे. तर तीन रुग्णांवर आयसोलेशन वॉर्डमध्ये औषधोपचार सुरू आहेत. या तिघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांनी दिली.

कोरोना बाधित आढळलेला चौथा रुग्ण हा कुडाळ तालुक्यातील जांभवडे गावातील असल्याने त्या गावाचा तीन कि. मी. चा परिसर ‘कंटेनमेंट झोन’ म्हणून घोषित करण्यात येऊन आरोग्य विभागामार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे त्या युवकाच्या अजून कोणी व्यक्ती संपर्कात आल्या असल्यास त्यांचा शोध घेण्यात येत आहे. कोरोना बाधित रुग्णासोबत आलेल्या तीनही व्यक्तींचे स्वॅब घेऊन पुन्हा कोरोना तपासणीसाठी पाठविले जाणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकाऱयांकडून देण्यात आली.

कोरोनाचे मुंबई कनेक्शन कधी थांबणार ?

पहिला रुग्ण कोरोना मुक्त झाल्यावर जिल्हा ग्रीनझोनच्या उंबरठय़ावर असतानाच कोरोनाचा दुसरा रुग्ण सापडला. त्यानंतर आठवडाभरात एकापाठोपाठ एक असे तीन कोरोना बाधित रुग्ण सापडले. विशेष म्हणजे चारही कोरोना बाधित रुग्ण मुंबईहून आले आहेत. त्यामुळे जिल्हय़ाबाहेरून आलेल्या व्यक्तींपासून कोरोनाचा शिरकाव होत आहे. दुसरीकडे मुंबईतील चाकरमान्यांना कोकणात आणण्यासाठी हालचाली सुरू आहेत. मात्र मुंबईहून आलेल्यांपैकीच चौघे कोरोना बाधित आढळल्याने हे सत्र थांबण्यासाठी प्रयत्न होणार किंवा कसे, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Our Channel

YouTube player

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung hero

YouTube player

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img