29.4 C
Panjim
Monday, March 20, 2023

सिंधुदुर्गात चाकरमान्यांची गर्दी, पळवाटेने काढताहेत पळ प्रशासन हतबल rt-pcr तपासणी न करताच चाकरमानि घरी

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल होऊ लागले आहेत. या चकरमान्यांची येथील रेल्वे स्टेशन मध्ये rt-pcr चाचणी केली जात आहे. ही चाचणी चुकविण्यासाठी चाकरमानी येथील पळवाटांनी पळ काढताना दिसत आहेत. चाकरमान्यांच्या या कारनाम्यांनी प्रशासनही हतबल झाले आहे.

चाकरमान्यांची होतेय मोठी गर्दी

काही दिवसांवर आल्याने कोकणात चाकरमानी मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत आम्ही हे चाकरमानी कणकवली स्थानकात हजारोंच्या संख्येने दाखल होत आहेत आज कणकवली रेल्वे स्थानकात मुंबईतील चाकरमानी मेंगलोर एक्सप्रेस व कोकण कन्या एक्सप्रेस ने आले असता मोठी गर्दी झाली होती यावेळी आरोग्य कर्मचारी व महसूल कर्मचारी व शिक्षक तुमच्याकडून तपासणी करण्यात येत असतानाच प्रवासी वैतागले व आम्ही कोणतीही चाचणी नाही करणार नाही, असे आमच्यावरच निर्बंध का ? असा संतप्त सवाल विचारत आपल्या घरी निघून गेले त्यामुळे आरोग्य विभाग व महसूल कर्मचारी शिक्षकांवर मोठा ताण आल्याचे पाहायला मिळाले.

पळवाटेने काढताहेत पळ

तर काही चाकरमानी ही तपासणी चुकविण्यासाठी पळवाटेने पळ काढताहेत. कणकवलीत रेल्वे स्टेशन वर हे चित्र आज पहायला मिळाले. चाकरमानी ज्या वाटेने पळ काढताहेत त्या वाटेवर रिक्षाही त्यांना घेण्यासाठी थांबलेल्या दिसतात. दरम्यान चाकरमान्यांचे हे कारनामे येथील कोरोनाचे संकट वाढविणारे ठरणार आहे.

वैतागले चाकरमानी थांबण्याच्या मनस्थितीत नाहीत

सध्या 18 वर्षेवरील ज्या नागरिकांनि 1 डोस घेतला असले व त्यांनि rt-pcr चाचणी करून 72 तास झाले असतील तर त्यांची पुन्हा rt-pcr चाचणी करणार असे आरोग्या विभागाकडून सांगण्यात येत आहे. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी तसे आदेश दिले आहेत. ज्यांचे दोन डोस पूर्ण झाले असतील त्यांच्या सर्टिफिकेट ची तपासणी करून त्यांनाही सोडण्यात येत आहे. पण प्रत्यक्षात मात्र कणकवलीत स्थानकात परिस्थिती खूपच वेगळी पाहायला मिळत आहे. कारण रात्रभर प्रवास करून वैतागले चाकरमानी कणकवली येऊन ताटकळत थांबण्याच्या मनस्थितीत दिसत नसल्याने तपासणी न करताच घरी जाताना दिसत आहेत. नोडल ऑफीसर डॉ बाजीराव पालवे,आरोग्य सहाय्यक विलास पवार,
डॉक्टर नीता राजगोळकर समुदाय आरोग्य अधिकारी, नीलम निलेश कांबळे, आदी कर्मचाऱ्यांचे पथक या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे.

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Our Channel

YouTube player

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung hero

YouTube player
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles