22.3 C
Panjim
Wednesday, January 19, 2022

सिंधुदुर्गात कोरोना टेस्ट लॅब मंजूर, मुख्यमंत्र्यांनी दिली मान्यता आमदार वैभव नाईक यांनी दिली माहिती

Latest Hub Encounter

 

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना आता कोरोना टेस्ट लॅब मंजूर झाली आहे. 29 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. सदर लॅबचे प्रशिक्षण घेण्यासाठी आज जिल्हा रुग्णालयाचे दोन तज्ञ पुणे येथे रवाना झाले आहेत.

येत्या 20 ते 25 दिवसात लॅब सुरू होईल अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी आज कणकवलीत दिली. या लॅबमुळे कोकणात दाखल होणाऱ्या चाकरमानी लोकांच्या तात्काळ तपासण्या करणे सोपे जाणार आहे. जिल्ह्यात सध्या लाखो चाकरमानी दाखल झाले आहेत. तसेच सध्या कोरोनाच्या तपासण्या पुणे येथून होऊन यायला 8 दिवसातून अधिक कालावधी जात आहे. त्यामुळे मोठ्या अडचणी येत आहेत. आता या जिल्हा रुग्णालयात होणाऱ्या लॅबमुळे तात्काळ तपासण्या करता येऊन रुगणांवर उपचार करणे सोपे जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -