सिंधुदुर्गात आणखी 17 नमुन्यांचा आहवाल निगेटीव्ह

0
85

 

सिंधुदुर्ग जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे एकूण 160 नमुने तपासणीसाठी मिरज येथे पाठविण्यात आले असून त्यापैकी 123 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. आज आणखी 17 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून ते सर्व निगेटीव्ह आहेत. तसेच 37 नमुन्यांचा आहवाल येणे बाकी आहे.
जिल्ह्यात 382 व्यक्तींना घरीच अलगीकरण करण्यात आले आहे. 62 व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात असून 223 व्यक्तींचा 28 दिवसांचा अलगीकरणाचा कालावधी संपला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात 57 व्यक्ती दाखल आहेत.
कोविड – 19 रोगाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या दृष्टीने जिल्हा रुग्णालयाच्या पथकातर्फे जिल्ह्यातील 7 वृद्धाश्रमांची तपासणी करण्यात आली. एकूण 372 रुग्णांची तपासणी करून त्यांचे समुपदेशन करण्यात आले. तसेच आश्रमातील वृद्धांची रक्तदाब, मधुमेह तपासणी करुन दोन महिन्यांच्या औषधांचा पुरवठा करण्यात आला. तसेच जिल्ह्यातील 6 निवारा केंद्रांची तपासणीही या पथकामार्फत करण्यात आली. त्यामध्ये 101 व्यक्तींची तपासणी करून त्यांचे समुपदेशन करण्यात आले. जिल्ह्यातील ओरोस व सावंतवाडी येथील कारागृहातील कैद्यांची तपासणी वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली. ओरोस येथील 66 कैद्यांची तपासणी केली. त्यातील 10 कैद्यांना असलेल्या किरकोळ आजारांवर औषधोपचार करण्यात आले. तर सावंतवाडी येथील कारागृहातील 60 कैद्यांची तपासणी करून त्यापैकी किरकोळ आजार असलेल्या 17 कैद्यांवर औषधोपचार करण्यात आले. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये सध्या जिल्हा रुग्णालयामार्फत 7 डायलेसिसचे व 1 केमोथेरपीचे रुग्ण सेवा घेत आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत आज 1730 व्यक्तींची तपासणी करण्यात आली.
अ.क्र विषय संख्या
1 घरीच अलगीकरण करण्यात आलेले 382
2 संस्थात्मक अलगीकरणात असलेले 57
3 पाठविण्यात आलेले एकूण नमुने 160
4 अहवाल प्राप्त झालेले नमुने 123
5 आतापर्यंत पॉजिटीव्ह आलेले नमुने 1
6 निगेटीव्ह आलेले नमुने 122
7 अहवाल प्राप्त न झालेले नमुने 37
8 विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण 57
9 सध्यस्थितीत जिल्ह्यातील पॉजिटीव्ह रुग्ण 00
10 आज रोजी तपासणी करण्यात आलेल्या व्यक्ती 1730
00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here