27 C
Panjim
Wednesday, August 17, 2022

सिंधुदुर्गच्या किनाऱ्यावर जलक्रीडा व्यावसायिकांचा नवा संघर्ष शासनाच्या नवनव्या नियमाने व्यावसायिक बेजार

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात कोरोना काळातील नियमात शिथिलता आली आणि पर्यटन व्यवसायानेही नव्याने जोरदार सुरवात केली. मात्र येथील पर्यटनाचे मुख्य केंद्र असलेल्या जलक्रीडा व्यवसायाला एमएमबी अर्थात महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने लाल झेंडा दाखवला आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश मानायला मेरीटाईम बोर्ड तयार नाही. तर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश येत नाहीत तोवर जलक्रीडा व्यवसाय थांबवत नाही. अशी भूमिका जलक्रीडा व्यावसायिकांनी घेतली आहे. यातून नवा संघर्ष जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात उभा राहिला आहे.

सुमारे ७५ कोटींची गुणतवणूक

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, मालवण व वेंगुर्ला या तालुक्यांना अरबी समुद्राचा किनारा लाभलेला आहे. यापैकी मालवण हा समुद्री पर्यटनाचे माहेरघर म्हणून ओळख असलेला तालुका आहे. मालवणमधील देवबाग, तारकर्ली आणि मालवण किल्ला या ठिकाणांना पर्यटक मोठी पसंदी देतात. मालवण सिंधुदुर्ग किल्ल्याला वर्षाकाठी चार लाखाच्या आसपास पर्यटक भेट देतात. त्यापैकी सुमारे पावणेदोन लाख पर्यटक जलक्रिडेतील विविध प्रकारांचा अनुभव घेतात. तिन्ही तालुक्यात जलक्रीडा व्यवसायात २२ गट कार्यरत आहेत. तर स्कुबा व्यवसायात २९ गट कार्यरत आहेत. या गटातील तरुणांनी विविध बँकांचे कर्ज काढून साधारण ७५ कोटींची गुंतवणूक केली आहे. आज हे व्यावसायिक अडचणीत आहेत.

शासनाने लवकरात लवकर एसओपी तयार करावी अन्यथा….

रुपेश प्रभू हे मालवणमध्ये जलक्रीडा व्यवसाय चालवतात. ते म्हणाले प्रत्येकाने स्वतःकडची रक्कम आणि बँकेकडून कर्ज उचलून या व्यवसायात गुंतवणूक केली आहे. गेली ९ ते १० महिने हा व्यवसाय ठप्प आहे. मात्र शासनाने आता एसओपी अर्थात Standard Operating Procedure तयार करून परवानगी द्यायला हवी होती मात्र ती अजून मिळालेली नाही. त्यामुळे बऱ्याचवेळा आमच्यावर बंद करायचा दबाव येतो. मात्र हा व्यवसाय आम्ही बंद केल्यास आमच्यावर उपासमारीची वेळ येईल. मच्छिमारी ठप्प आहे त्यातून पर्यायी मार्ग म्हणून आम्ही हा व्यवसाय स्वीकारला आहे. आता कुठे टुरिझम चालू होतंय आणि आता कुठे बंद आली तर येणार सीजन आमच्यासाठी बंद होणार आहे. त्यामुळे लोकांना कर्ज भरायला आणि त्यांच्या गरजा भागवायला पैसे राहणार नाहीत. त्यातून चोरीमारी वाढेल. अधिकाऱ्यांना मारहाणीसारखे प्रकार वाढू लागतील. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर एसओपी तयार करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

बेरोजगारांच्या रोजगाराचा भीषण प्रश्न निर्माण झालायं

रोहित पालव हा तरुण LLB झाला आहे. मालवण मध्ये त्याने गतवर्षी पासून जलक्रीडा व्यवसाय सुरु केला आहे. तो सांगतो मी जिल्हा बँकेचं कर्ज काढून स्कुबा डायविंगचे सामान खरेदी केले. आता व्यवसाय सुरु करणार तोच वादळ आलं. दिवाळीचा सर्व सीजन वाया गेला. त्यानंतर कोरोना आला. आता कुठे पर्यटन व्यवसाय सुरु होतोय तर दर दिवशीचे नवे नियम आड येताहेत. अचानक होणाऱ्या कारवाईमुळे आम्हाला आमचं सामान घेऊन वर यावं लागत. त्यातून आमचं बॅड मार्केटिंग होत. पर्यटक आपली काळजी घेतात, आम्हीही त्यांची काळजी घेतो. परंतु कारवाईच्या भीतीने पर्यटक घाबरतात. गोव्यात सर्व सुरळीत सुरु आहे. आमची तर गुंतवणूक आहेच शिवाय प्रत्येक स्कुबा व्यावसायिकाकडे १० ते १२ तरुण काम करतात. यामध्ये अनेक मूल उच्च शिक्षित आहेत. त्यांच्याही रोजगाराचा प्रश्न आहे. जिलाधिकाऱ्यांची परवानगी आहे मात्र एमएमबी अर्थात महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड कारवाई करत. त्यामुळे लोकही आता आपल्या मुलांना कमला पाठवायला घाबरतात. त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल अशी त्यांना भीती वाटते. असे त्याने सांगितले.

त्यावेळीहि शासनाने अन्यायच केला….

रश्मीन रोगे सांगतो आमचा पारंपरिक पद्धतीने मासेमारीचा व्यवसाय होता. त्या ठिकाणी आता आधुनिक मासेमारीचा जो उद्रेक झाला त्या उद्रेकापुढे आम्हला त्यावेळीही शासनाने न्याय दिलेला नाही. त्यामुळे आम्ही जलक्रीडा पर्यटन व्यवसायाकडे वळलो. हे सर्व सुरळीत सुरू होत. शासनाचा करही आम्ही नियमित भरत आहोत. मात्र आता शासनाच्या आडमुठ्या धोरणाचा आमच्या व्यवसायावर परिणाम होतो आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी पाठीशी राहत नाहीत आणि अधिकारी व्यवस्थित मार्गदर्शन करत नाहीत. त्याचा परिणाम आमच्या व्यवसायावर होत आहे. असे त्याने सांगितले.

दरम्यान कोरोनामुळे आधीच होरपळलेयेथील पर्यटन व्यावसायिकाची शासनाने दखल घेतली नाही तर जिल्ह्याच्या किनाऱ्यावर आता मच्छिमार बांधवांच्या असंतोषाबरोबर जलक्रीडा पर्यटन व्यावसायिकांचा उद्रेक उफाळून येण्याची दाट शक्यता आहे.

triumph-high school-ad

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player
YouTube player

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img