साताऱ्यातून उदयनराजे ८१ हजार मतांनी पीछाडीवर

0
188

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. ऐन निवडणुकीच्या आधी खासदारकीचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीला रामराम ठोकणारे उदयनराजे भोसले तब्बल ८१ हजार मतांनी पीछाडीवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या झंझावाती प्रचाराचा फटका उदयनराजेंना बसल्याचं बोललं जात आहे. शरद पवार यांनी भर पावसात भिजत या ठिकाणी सभा घेतली होती. त्यामुळे साताऱ्यात राष्ट्रवादीला पाऊस पावला असं म्हटलं जात.

शरद पवारांचे खंदे समर्थक व साताऱ्याचे माजी आमदार श्रीनिवास पाटील हे त्यांना जोरदार लढत देत असल्याचं दिसत आहे. उच्चशिक्षित असलेल्या श्रीनिवास पाटील यांच्याबाबत मतदारांमध्ये आपुलकीची भावना आहे. पवारांना मानणाऱ्या साताऱ्यातील मतदारांनी त्यांना साथ दिल्याचं दिसत आहे. अर्थात, मतमोजणीच्या अनेक फेऱ्या अद्याप बाकी असल्यानं अंतिम निकालाची वाट पाहावी लागणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here