संतोष परब हल्ल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा नितेश राणेंना आणखीन एक धक्का नितेश राणे यांचे निकटवर्तीय गोट्या सावंत यांचाही जामीन अर्ज फेटाळला

0
86

 

सिंधुदुर्ग – शिवसैनिक संतोष परब यांच्यावर कणकवलीत झालेल्या खुनी हल्ला प्रकरण जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि आमदार नितेश राणे यांचे निकटवर्तीय गोट्या सावंत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळला आहे. त्यांना जिल्हा न्यायालयात शरण येण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. यामुळे नितेश राणे यांना आणखीन एक धक्का बसला आहे.

जिल्हा बँक निवडणुकीदरम्यान बँकेचे तत्कालीन अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावर खुनी हल्ला झाला होता. हा हल्ला झाल्यानंतर घटनास्थळावरून हल्लेखोरांपैकी एकाने आमदार नितेश राणे आणि गोट्या सावंत यांना फोन लावा असे दुसऱ्याला सांगितले होते. असे संतोष परब यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले होते या पार्श्वभूमीवर पोलीस गोट्या सावंत यांचा शोध घेत होते. दरम्यान सामंत यांनी अटकपूर्व जामीन अर्ज साठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती जिल्हा न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. या ठिकाणी त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. त्यावर सोमवारी झालेल्या सुनावणीत त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. न्यायालयाने त्यांना पुढच्या दहा दिवसात जिल्हा न्यायालयात शरण येण्याचे आदेश दिले आहेत.

सावंत कणकवलीत येणारे शरण

आमदार नितेश राणे यांचे निकटवर्ती असलेले गोट्या सावंत हे कणकवली न्यायालयात मंगळवारी शरण येण्याची शक्यता आहे. आमदार नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयात शरण येण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर नितेश राणे हे जिल्हा न्यायालयात शरण येतात त्यांनी आपल्या अटकपूर्व जामीन अर्जावर फेरविचार याचिका दाखल केली होती त्यांची ही याचिका न्यायालयाने फेटाळली होती. त्यानंतर त्यांना कणकवली न्यायालयात शरण यावे लागले होते. हा अनुभव लक्षात घेता सावंत हेदेखील कणकवली न्यायालयात शरण येण्याची शक्यता आहे. दरम्यान त्यांची जामिनावर मुक्त होते की नितेश राणे यांच्या प्रमाणे पोलीस कस्टडीत जावे लागते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here