संतोष परब यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी चौघे जण ताब्यात

0
42

सिंधुदुर्ग – कणकवलीतील शिवसैनिक व करंजे गावचे माजी सरपंच संतोष परब यांच्यावर शनिवारी झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर पोलिसांनी केलेल्या नाकाबंदित फोंडाघाट चेक पोस्टवर पकडलेली कार व त्यातील चार तरुणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याची खात्रीशीर माहिती आहे.

या चौघा ही तरुणांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु असून, नेमका त्यांनी हा प्रकार कुणाच्या सांगण्यावरून केला? याचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यातच या प्रकरणामागे राजकीय कारण आहे की अन्य काही? याबाबतही पोलिस तपास सुरू आहे.

मात्र याबाबत पोलिसांनी अधिकृत माहिती देण्यास नकार दिला. दरम्यान या प्रकरणी पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे हे जातीनिशी लक्ष घालत असून, कणकवली डीवायएसपी, पोलीस निरीक्षक यांच्यासह निवडक पोलिसांच्या उपस्थितीत या चारही संशयितांची कणकवली पोलीस ठाण्यात चौकशी सुरू असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here