25 C
Panjim
Monday, December 5, 2022

व्हॅलेंटाईन डेची भेट म्हणून त्या सात नगरसेवकांना पाठवले त्यांचा उद्धव ठाकरेंनी स्वीकार करावा आमदार नितेश राणे यांची उपरोधित प्रतिक्रिया

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

 

सिंधुदुर्ग – शिवसेना हे आमचे जुने प्रेम आहे. व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने हे सात नगरसेवक मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवले आहेत. आमच्या मेडिकल कॉलेजच्या फाईलवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही केली. याबाबत आम्ही त्यांना पुष्पगुच्छ जरी पाठवला तरी ते आमच्याकडून घेणार नाहीत. मात्र त्यांना एक भेट म्हणून हे नगरसेवक त्यांच्याकडे पाठवत आहे. त्यांनी त्यांचा स्वीकार करावा. अशा उपरोधित शब्दात वाभावें – वैभववाडी नगरपंचायतीच्या नगरसेवकांनी भाजपाचा दिलेल्या राजीनाम्यावर आमदार नितेश राणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान आगामी निवडणुकीत वैभववाडी नगरपंचायतमध्ये १७ ही नगरसेवक भाजपाचेच असतील असा विश्वास भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी व्यक्त केला आहे.

मूळ शिवसेनेकडे उमेदवार नाहीत म्हणून हे ७ जण दिले

वाभावें – वैभववाडी नगरपंचायतीच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये मूळ शिवसेनेने जवळ उमेदवार मिळत नाहीत अशी तेथे शिवसेनेची आज परिस्थिती आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची अशी अवस्था होऊ नये. अशी बाळासाहेबांवर प्रेम करणारे निष्ठावान कुटुंबीय म्हणून आमची भावना असल्याचा टोला आमदार नितेश राणे यांनी लगावला. व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने हे सात नगरसेवक मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवले आहेत. असेही ते म्हणाले आहेत.

आम्ही उद्धव ठाकरेंना काही देऊ शकत नाही व आम्ही दिले तर ते घेणार नाहीत

वैभववाडी मधील त्या ७ नगरसेवकांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाच्या अनुषंगाने नितेश राणे पुढे म्हणाले, व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने हे सात नगरसेवक मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवले आहेत. आमच्या मेडिकल कॉलेजच्या रूटीन फाईल वर सही करण्यासाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेना जेव्हा फोन केला होता तेव्हा उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आमच्या मेडिकल कॉलेजच्या रुटीन फाईलवर त्यांनी सही केली. आम्ही उद्धव ठाकरेंना काही देऊ शकत नाही व आम्ही दिले तर ते घेणार नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे आभार मानण्यासाठी हे सात नगरसेवक मी त्यांच्याकडे पाठवत आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने मी शिवसेना व उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देतो असा उपरोधिक टोला नितेश राणे यांनी लगावला.

निवडणुकीत वैभववाडी नगरपंचायतमध्ये १७ ही नगरसेवक भाजपाचेच असतील

भाजपाकडून सत्तेची फळे चाखून वॉर्डनिहाय आरक्षण जाहीर होताच वैभवावाडीत नगरसेवकांनी शिवसेनेत उडी मारली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत धूळ खाल्लेल्या स्थानिक शिवसेना नेत्यांची पक्षश्रेष्ठींना खुश करण्यासाठी ही केविलवाणी धडपड असल्याची टीका भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केली. एप्रिलमध्ये होणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीत वैभववाडी नगरपंचायतमध्ये १७ ही नगरसेवक भाजपाचेच असतील असा विश्वास तेली यांनी व्यक्त केला. संतोष पवार हे शिवसेनेतून तर स्वप्नील इस्वलकर आणि रवींद्र रावराणे हे अपक्ष निवडून आले होते. सत्तेसाठी ते भाजपात दाखल झाले. वैभववाडीत १०० मतांचा वॉर्ड आहे. नगरपंचायत चे एकूण मतदार फक्त १ हजार ८०० आहेत. तर कोलगाव सारखी ५ हजार मतांची ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात आहे. त्यामुळे मतांतील फरक समजून घ्या. जे नगरसेवक आज शिवसेनेत गेलेत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप शिवसेनेने केले होते. मग असे नगरसेवक आता शिवसेनेला कसे चालतील ? असा सवालही तेली यांनी केला.

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Our Channel

YouTube player

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung hero

YouTube player
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles