सिंधुदुर्ग – आंघोळीसाठी मित्रासमवेत येथिल शिवगंगा नदीत गेलेला तरुण वाहून गेल्याचा प्रकार वैभववाडी लोरे नं. २ येथे घडला आहे.तर त्याच्या सोबत असलेले अन्य तिघे सुखरुप आहेत.
ही घटना काल सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. भुषण नाईक (वय ४०) असे त्याचे नाव आहे. सोबत असलेल्या युवकांनी दिलेल्या माहीतीनुसार याबाबत पोलिस पाटील लवू रावराणे यांनी दिलेल्या माहीतीनुसार पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
तर संबधित युवकाचा शोध घेण्याच्या सुचना आपत्कालीन विभागाला देण्यात आल्या आहेत. येथिल वाहून गेलेला तरुण आपले सहकारी नितीन पेडणेकर,संदिप जाधव,आशिष मसे यांच्या समवेत परिसरात असलेल्या शिवगंगा नदीत आंघोळीसाठी गेला होता.
मात्र तो अचानक प्रवाहात वाहून गेला. त्याची शोधाशोध सुरू आहे. त्यासाठी तहसिलदार रामदास झळके व अन्य यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.