विकेल ते पिकेल योजनेअंतर्गत कसाल मालवण रस्यावर उभारलेल्या विक्री केंद्रांचे आ.वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन

0
118

 

सिंधुदुर्ग – शेतात राबवून पिकविलेल्या मालाला योग्य हमीभाव मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने विकेल ते पिकेल ही योजना राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या वतीने शुक्रवारी कसाल मालवण रोडवर शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्राचा शुभारंभ कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व फित कापून करण्यात आला. सावरवाड,कुसरवे येथील शेतकरी ज्ञानेश्वर चव्हाण,रविंद्र मांजरेकर व प्रकाश म्हाडगुत यांनी हे विक्री केंद्राचे स्टॉल उभारले आहेत.यावेळी सी. एस. आर फंडातून प्राप्त छत्रीचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते शेतकरी रविंद्र मांजरेकर यांना वितरण करण्यात आले.
*यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले,* शेतकऱ्यांनी पिकविलेल्या शेत मालाला हमखास भाव मिळाला पाहिजे यासाठी विकेल ते पिकेल ही योजना शासनामार्फत राबविली जात आहे. ज्या मालाला बाजारपेठ आहे तो माल पिकविण्यासाठी शेतकऱ्यांनी संघटित होऊन गट शेतीच्या माध्यमातून प्रयत्न केले पाहिजेत. सावरवाड,कुसरवे येथील शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री केंद्र सुरु केली आहेत अशाप्रकारे स्वतः उत्पादित केलेला शेतमाल स्वतः विक्री करण्यासाठी इतर शेतकऱ्यांनी देखील त्यांचे अनुकरण करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या विक्री केंद्रांना अनुदान मिळण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून उत्पादित मालाचे मार्केटिंग करण्यासाठी शेतकऱ्यांना सहकार्य करण्याची ग्वाही आमदार वैभव नाईक यांनी यावेळी दिली. व कृषि विभाग राबवित असलेल्या या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. मालवण तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना विकेल ते पिकेल अभियान ची संकल्पना बाबत सविस्तर माहिती दिली.
यावेळी कृषिपर्यक्षक धनंजय गावडे,कृषिसहाय्यक पवनकुमार सौंगडे, अमृता भोगले, विद्या कुबल, मनिषा गिते, युवराज ढोलम,किरण रावले, तुळशीदास चव्हाण, रविंद्र मांजरेकर, वैभव म्हाडगुत व बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here