31.6 C
Panjim
Wednesday, November 30, 2022

रत्नागिरीच्या नौकेवर चीनची VTS यंत्रणा ; सुरक्षा यंत्रणेची झोप उडाली सुरक्षा यंत्रणेची उडाली झोप ; चायनीज यंत्रणा असलेली नौका निघाली रत्नागिरीची

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

सिंधुदुर्ग – चीनी कंपनीच्या व्हीटीएस् यंत्रणेने सुरक्षा यंत्रणेची झोप उडविली.कोस्टगार्डच्या जीपीएस् लोकेशनमध्ये देवगड समुद्रात चीनी बोटींचा वावर असल्याचे निदर्शनास आले आणि सर्व सुरक्षा यंत्रणा खडबडून जागी झाली.कोस्टगार्डने पोलिस यंत्रणेला संशयित चीनी बोटींचा शोध घ्या अशा सुचना दिल्या व दोन्ही यंत्रणा कामाला लागली.सागर पोलिस विभागाने गस्तीनौकेने शोधमोहिम राबविल्यानंतर गिर्ये समुद्रात चायनीज व्हीटीएस् यंत्रणा असलेली बोट सापडली मात्र ही बोट रत्नागिरी येथील असल्याचे निष्पन्न झाले असून पुढील तपास व कारवाईसाठी देवगड बंदरात आणून मत्स्यव्यवसाय विभागाच्या ताब्यात देण्यात आली आहे.

सदर बोट दाऊद इब्राहीम साखरकर यांची

विशेष म्हणजे ही नौका यांत्रिकी मच्छिमारी नौका आहे मात्र यावर पर्सनेट जाळी असल्याने गोलमाल है बाबा सब गोलमाल है अशी स्थिती झाली आहे. देवगड समुद्रात चीनी बोटी असल्याचे लोकेशन कोस्टगार्डला जीपीएस् यंत्रणेवर मिळाले.गेले दोन ते तीन दिवस या नौका देवगड समुद्रात असल्याचे समजल्यानंतर तात्काळ याबाबतची माहिती मत्स्यव्यवसाय व पोलिसांना देण्यात आली दरम्यान मत्स्यव्यवसाय विभागाकडे गस्तीनौका नसल्याने सागर पोलिस विभागाकडे ही कामगीरी सोपविण्यात आली.
नौकांचा शोध घेण्यासाठी सागर सुरक्षा देवगड शाखेची टीम सागरकन्या गस्तीनौकेने समुद्रात रवाना झाली.या टीममध्ये सागरी सुरक्षा विभागाचे पोलिस उपनिरिक्षक जितेंद्र साळूंखे, विशाल कराळे, तेली, पोलिस नाईक तांबे, पो.कॉ.निलेश पाटील यांचा समावेश होता.
या टीमला विवारी दुपारी १ वा. सुमारास गिर्ये पवनचक्कीसमोर ११.५ नॉटीकल मैलमध्ये चीनी कंपनीची व्हीटीएस यंत्रणा असलेली रत्नागिरी येथील दाऊद इब्राहीम साखरकर यांची ही इब्राहीम साखरकर नौका सापडली.

नौकेवर बेकायदा जाळी आणि साहित्य

या नौेकेबरोबरच तेथिलच असलेल्या दोन नौका पसार झाल्या.पोलिसांनी या नौकेला देवगड बंदरात आणून मत्स्यव्यवसाय विभागाच्या ताब्यात दिले.या नौकेवर चीनी कंपनीची व्हीटीएस् यंत्रणा बसविण्यात आली आहे मात्र या यंत्रणेचे भारतीय नोंदणीकरण्यात न आल्याने ही नौका चीनमधील असल्याचे लोकेशन जीपीएस् यंत्रणेवर दिसत होते.यामुळे सुरक्षा यंत्रणेमध्ये खळबळ उडाली व यंत्रणा संशयित चीनी बोटींचा शोध घेण्याचा कामाला लागली.अखेर अशी यंत्रणा असलेली रत्नागिरी येथीलच बोट सापडली असून भारतीय रजिस्टड्ढेशन न केल्यामुळे चीनची नौका असल्याची माहिती यंत्रणेला प्राप्त झाल्याने खळबळ उडाली दरम्यान ही नौका भारतीय असल्याचे निष्पन्न झाल्याने सुरक्षा यंत्रणेनेही सुटकेचा निश्वास सोडला आहे.
ही नौका मत्स्यव्यवसाय विभागाच्या ताब्यात दिल्यानंतर तपासणीअंती या नौकेवर पर्सनेट जाळी आढळल्याने खळबळ उडाली आहे तसेच नौकेवर जनरेटर, १० पेक्षा जास्त कर्मचारी, जाळ्यांची लांबी-रूंदी नियमबाह्य असल्याचे आढळल्याने मत्स्यव्यवसाय विभाग त्यादृष्टिने तपासणी करून पुढील कारवाई करणार आहे अशी माहिती मत्स्यव्यवसाय परवाना अधिकारी रवींद्र मालवणकर यांनी दिली.

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Our Channel

YouTube player

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung hero

YouTube player

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img